मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण भाजपने हाइप करून त्याला वेगळं वळण दिल्याचा दावा अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाने केला आहे, असं सांगतानाच महाराष्ट्राची बदनामी केल्याप्रकरणी भाजप आणि इतरांनी तात्काळ महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. (anil deshmukh reaction on sushant singh rajput case)
अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सुशांतप्रकरणावर भाष्य करतानाच भाजपवर टीकास्त्र सोडलं. अमेरिकच्या मिशिगन विद्यापीठानेही सुशांतप्रकरणाचा अभ्यास करून त्यावर अहवाल दिला आहे. भाजपने हे प्रकरण हायजॅक केलं. त्याला वेगळं वळण देऊन हे प्रकरण वेगळ्याच दिशेला नेलं. त्याशिवाय काही मीडियानेही या प्रकरणाला वेगळं वळण दिलं असून या मीडियांची नावंही या अहवालात देण्यात आली असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
सुशांतप्रकरणाचं निमित्त पुढे करून एका राजकीय पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी उचलली होती. महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्या देण्याचं काम करण्यात आलं. बाहेरच्या राज्यातील कठपुतलींनाही आपल्या तालावर नाचावण्याचं काम या पक्षाने केलं. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा प्रोफेशनली तपास केल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तरीही राज्याचं पाच वर्षे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला. मुंबई पोलिसांनी योग्य दिशेनं तपास केला नसल्याचं वक्तव्य फडणवीस यांनी केलं, अशी टीका देशमुख यांनी केली.
बिहारजे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची बदनामी केली. आता ते निवडणूक लढवत आहेत. देवेंद्र फडणवीस या पांडेंचा प्रचार करणार आहेत का?, असा सवालही त्यांनी केला. (anil deshmukh reaction on sushant singh rajput case)
एम्स आणि कूपर रुग्णालयाने आपला अहवाल दिला आहे. या अहवालातून सुशांतची हत्या झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच सुशांतच्या शरीरात विष नसल्याचंही आढळून आलं आहे. त्यामुळे सीबीआयने आपला अंतिम अहवाल तात्काळ द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
LIVETV | गृहमंत्री अनिल देशमुख लाईव्ह https://t.co/ZgbSAF7a8M @AnilDeshmukhNCP #SushantSinghRajput pic.twitter.com/OqgmNrsr0I
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 6, 2020
संबंधित बातम्या:
महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का? : अनिल देशमुख
(anil deshmukh reaction on sushant singh rajput case)