Sushant Singh Rajput Suicide | माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास, सत्यमेव जयते, रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रिया

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती संशयाच्या भोवऱ्यात अडकली (Rhea Chakraborty first reaction on Sushant Singh Rajput suicide case)  आहे.

Sushant Singh Rajput Suicide | माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास, सत्यमेव जयते, रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 01, 2020 | 12:43 AM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. रियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात रियाकडून खंडणीचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत रियाने खुलासा केला आहे. (Rhea Chakraborty first reaction on Sushant Singh Rajput suicide case)

“माझा देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल. माझ्याबद्दल प्रसारमाध्यमात खूप वाईट गोष्टी बोलल्या जात आहे. पण माझ्या वकीलांनी मला याबाबत भाष्य करण्यास मनाई केली आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. याप्रकरणाचे सत्य लवकरच समोर येईल, सत्यमेव जयते!” असे या व्हिडीओत रियाने म्हटलं आहे.

ईडी चौकशी करणार

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) तपास करणार आहे. याप्रकरणी ईडीने इन्फोर्समेंट केस रिपोर्ट नोंदवला आहे. ईडी आता सुशांतच्या बँक खात्याशी संबंधित आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी करणार आहे. सुशांतचे बँक खात्याचे सर्व डिटेल्स तपासले जातील. आर्थिक व्यवहार काय आणि कसे झाले, याची चौकशी होणार आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

ईडी मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे. ईडीने याबाबत बिहार पोलिसांना सूचान दिल्या आहेत. याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करावी, अशी सूचना ईडीकडून देण्यात आली आहे.

रिया चक्रवर्तीचा व्हिडीओ व्हायरल

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण नव्या वळणावर आलं असताना रिया चक्रवर्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ माहिती अधिकार कार्यकर्ते बिनू वारगीस यांनीदेखी ट्विट केला आहे. या व्हिडीओत रियाकडून खंडणीचा उल्लेख केल्याचं निदर्शनास येत आहे.

हेही वाचा – सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बिहार पोलीस मुंबईत, रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत

सुशांतच्या मृत्यूच्या 40 दिवसानंतर वडिलांनी पाटणा पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला. तीन पानी तक्रारीत त्यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही सुशांतच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपानंतर या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीला वेगऴे वळण लागले आहे. पाटणा पोलिसांचे पथक मुंबईत दाखल चौकशी करत आहे.

पाटणा पोलिसांच्या तपासातील महत्त्वाचे मुद्दे

1. केवळ काही दिवसाच्या अवधीत सुशांतच्या बँक खात्यातून 11 कोटी रुपये काढले गेले. ते पैसै नेमके कुठे गेले. त्याचा तपास सुरु झाला आहे. या अंतर्गत पोलिसांनी कोटक महिंद्रा बँकेतही चौकशी केली आहे.

2. सुशांतने एक कंपनी स्थापन केली होती. त्यामध्ये रिया, तिचा भाऊही संचालक बोर्डात होता. मात्र सुशांतच्या मृत्यूनंतर या कंपनीतून रिया आणि तिच्या भावाने काढता पाय घेतला. त्यामुळे आता या कंपनीत नेमके काय सुरु होते, किती रुपयांचे व्यवहार या कंपनीच्या माध्यमातून झाले होते, या कंपनीत कुणाचा किती स्टेक किती होता, रिया आणि तिच्या भावाचा नेमका काय रोल होता, या सर्वांची सखोल चौकशी आता होणार आहे. (Rhea Chakraborty first reaction on Sushant Singh Rajput suicide case)

संबंधित बातम्या : 

फडणवीसांकडून CBI चौकशीची मागणी, सुशांत प्रकरणात नव्या घडामोडी, रियाचा खंडणीबाबतचा व्हिडीओ व्हायरल

Sushant Death | आधी कंपनीच्या नावात ‘रिया’लिटी शब्द आणला, मग संचालकपद सोडले, रिया चक्रवर्ती संशयाच्या भोवऱ्यात

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.