स्वच्छता सर्वेक्षण 2020 : एक लाखाखालील स्वच्छ शहरात महाराष्ट्रातील 20 शहरं, कराड पहिल्या तर सासवड दुसऱ्या क्रमांकावर

एक लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत देशातील 25 शहरांचा समावेश (Top 3 Cleanest Cities in Maharashtra) आहे.

स्वच्छता सर्वेक्षण 2020 : एक लाखाखालील स्वच्छ शहरात महाराष्ट्रातील 20 शहरं, कराड पहिल्या तर सासवड दुसऱ्या क्रमांकावर
Follow us
| Updated on: Aug 20, 2020 | 7:08 PM

पुणे : केंद्र सरकारने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ या स्वच्छ शहरांच्या वार्षिक सर्व्हेचा निकाल जाहीर केला. यात 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या टॉप 3 स्वच्छ शहरं ही महाराष्ट्रातील आहेत. या यादीत पहिला क्रमांकावर साताऱ्यातील कराड, दुसऱ्या क्रमांकावर पुण्यातील सासवड, तर तिसऱ्या क्रमांकावर लोणावळा शहराचा समावेश आहे. त्याशिवाय या यादीत पन्हाळा, जेजुरी, शिर्डी यासारख्या इतर शहरांचा समावेश आहे. (Top 3 Cleanest Cities in Maharashtra)

स्वच्छ सर्वेक्षण 2020 याची विविध विभागवार नोंदणी केली जाते. यात एक लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत देशातील 25 शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील 20 शहर ही महाराष्ट्रातील आहेत. तर छत्तीसगडमधील 3, पंजाब आणि मध्यप्रदेशातील अनुक्रमे एका शहरांचा समावेश आहे.

दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून सासवड नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये सहभाग घेत आहे. 2018 मध्ये सासवडने राष्ट्रीय स्तरावर अठरावा क्रमांक पटकावून नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी 5 कोटीचे विशेष पारितोषिक मिळवले होते. तर 2019 मध्ये स्वच्छतेतील सर्वसाधारण प्रकारामध्ये सासवडने 12 क्रमांक पटकावला आहे. (Top 3 Cleanest Cities in Maharashtra)

स्वच्छ शहरांची क्रमवारी

1. इंदूर (मध्य प्रदेश) 2. सुरत (गुजरात) 3. नवी मुंबई (महाराष्ट्र) 4. अंबिकापूर (छत्तिसगढ) 5. म्हैसूर (कर्नाटक) 6. विजयवाडा (आंध्रप्रदेश) 7. अहमदाबाद (गुजरात) 8. नवी दिल्ली (दिल्ली) 9. चंद्रपूर (महाराष्ट्र) 10. खारगोने (मध्य प्रदेश)

मध्य प्रदेशातील इंदूर शहराने पुन्हा एकदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिले स्थान कायम राखले. इंदूर शहराने सलग चौथ्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरण्याचा मान पटकावला आहे. दुसर्‍या क्रमांकावर गुजरातमधील सुरत, तर तिसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर आहे. राज्यातून चंद्रपूर 9 व्या, धुळे 17 व्या तर नाशिक 23 व्या क्रमांकावर आहेत. (Top 3 Cleanest Cities in Maharashtra)

संबंधित बातम्या : 

Swachh Mahotsav | इंदूर सलग चौथ्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातून ‘हे’ शहर अव्वल

सरकारी नोकरीसाठी आता एकच फॉर्म, मोदी सरकारचा निर्णय

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.