‘चॉकलेट बॉय’ स्वप्निल जोशीच्या ‘समांतर 2’ वेब सीरीजच्या चित्रीकरणास सुरुवात!

‘समांतर’ ही वेब सीरीज वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘समांतर’ या कादंबरीवर आधारित आहे.

‘चॉकलेट बॉय’ स्वप्निल जोशीच्या ‘समांतर 2’ वेब सीरीजच्या चित्रीकरणास सुरुवात!
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 5:59 PM

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वाचा ‘चॉकलेट बॉय’ अर्थात अभिनेता स्वप्निल जोशीने (Swwapnil Joshi) ‘समांतर’ (Samantar series) या वेब सीरीजमधून डिजिटल विश्वात पदार्पण केले होते. त्याच्या या पदार्पणाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘समांतर’ ही वेब सीरीज वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘समांतर’ या कादंबरीवर आधारित आहे. दिग्दर्शक सतिश राजवाडे यांनी या वेब सीरीजच्या पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन केले होते. आता लवकरच या प्रसिद्ध वेब सीरीजचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या वेब सीरीजच्या दुसऱ्या पर्वाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.(Swwapnil Joshi’s web series Samantar season 2 shooting started)

‘समांतर’ सीरीजच्या पहिल्या पर्वात अभिनेता स्वप्निल जोशी मुख्य भूमिकेत दिसला होता. तर, त्याच्यासोबत अभिनेत्री तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. या वेब सीरीजच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर कृष्णाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले दिन अभिनेते अर्थात स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज हे कलाकार एकत्र काम करताना पाहायला मिळाले होते.

सुदर्शन चक्रपाणीची पुढची कथा…

सुदर्शन चक्रपाणीच्या शोधात असलेला कुमार महाजन आणि त्याला भेटल्यानंतर कुमार महाजनच्या आयुष्यात काय घडते, हे पहिल्या पर्वात पाहायला मिळाले होते. मात्र, आता दुसऱ्या पर्वात ही कथा पुढे जाताना दिसणार आहे. या सीरीजच्या दुसऱ्या पर्वामध्ये स्वप्निल जोशीसह इतर आणखी कोणती नवी पात्र पाहायला मिळतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.(Swwapnil Joshi’s web series Samantar season 2 shooting started)

‘समांतर’ या वेब सीरीजच्या दुसऱ्या पर्वाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस करत आहेत. तेव्हा आता या दुसऱ्या सिझनमध्ये काहीतरी वेगळेपणही पाहायला मिळणार आहे. सोशल मीडिया चित्रीकरण सुरू झाल्याचे म्हणत एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ‘आणि अशाप्रकारे ‘समांतर २’चं चित्रीकरण सुरू झालंय. लवकरच घेऊन येतोय तुमच्या भेटीला!!’, असे कॅप्शन देण्यात आले आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

‘समांतर 2’ च्या चित्रीकरणाची सुरुवात झाल्यानंतर आता ही वेब सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लॉकडाऊनच्या आधी या वेब सीरीजचे पहिले पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या वेब सीरीजद्वारे स्वप्निल जोशीने वेब विश्वात पदार्पण केले होते. या पहिल्याच पर्वाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच दुसरे पर्वही प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतेय का, हे सीरीज प्रदर्शित झाल्यावरच कळणार आहे.

(Swwapnil Joshi’s web series Samantar season 2 shooting started)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.