Syed Mushtaq Ali Trophy | 3 संघांचे खेळाडू थांबलेल्या हॉटेलमध्ये कोरोनाचा फैलाव, 20 जण पॉझिटिव्ह

अवघ्या काही दिवसांनी देशांतर्गत सर्वात मोठी टी 20 स्पर्धा अर्थात सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेला सुरुवात होत आहे.

Syed Mushtaq Ali Trophy | 3 संघांचे खेळाडू थांबलेल्या हॉटेलमध्ये कोरोनाचा फैलाव, 20 जण पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 6:51 AM

मुंबई : अवघ्या काही दिवसांनी देशांतर्गत सर्वात मोठी टी 20 स्पर्धा अर्थात सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेला (Syed Mushtaq Ali Trophy) सुरुवात होत आहे. 10 जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र या स्पर्धेच्या सुरुवातीआधीच याला गालबोट लागलं आहे. बीसीसीआयसह अनेक खेळाडूंच्या चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. चेन्नईमधील ज्या हॉटेलमध्ये तीन संघांचे खेळाडू राहात आहेत. त्या हॉटलेमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. हे सर्व कोरोनाबाधित रुग्ण हॉटेलच्या स्टाफपैकी आहेत. (Syed Mushtaq Ali Trophy | Corona spread in hotel where players of 3 teams staying, 20 positive)

दरम्यान, तामिळनाडू क्रिकेट संघाने (टीएनसीए) सांगितले की, “सर्व खेळाडू सुरक्षित असून घाबरण्याची गरज नाही”. या हॉटेलमध्ये मेघालय, मणिपूर आणि मिझोरम या तीन संघांचे खेळाडू राहात आहेत. टीएनसीएच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, घाबरण्याची आवश्यकता नाही. खेळाडू आणि स्पर्धेशी संबंधित अन्य लोक लीला पॅलेसमध्ये (हॉटेल) थांबले होते, ते सर्वजण सुरक्षित आहेत. त्यांना अत्यंत सुरक्षित वातावरणात ठेवले आहे. दरम्यान एका खेळाडूने सांगितले की, आम्ही सर्व खेळाडू हॉटेलमधील आमच्या खोल्यांमध्येच आहोत. सध्या तरी सर्व काही ठिक आहे. नुकतीच आमची चाचणी करण्यात आली आहे.

सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या प्लेट ग्रुप सामन्यांना सुरुवात होणार आहे. चेन्नईमधील अनेक ठिकाणी 11 जानेवारीपासून सामन्यांना सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, हॉटेलमधील स्टाफमध्ये कोरोनाचे संक्रमण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आयटीसी ग्रँड चोला या हॉटेलमधील 80 जणांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान बीसीसीआयने खेळाडूंसाठी वेगळ्या किचनमध्ये जेवण बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हे किचन बायो बबलमध्ये असेल. हॉटेल स्टाफमधील लोकांना कोरोना झाल्याची बातमी समजल्यापासून अनेक खेळाडू चिंतेत आहेत.

मुंबईत क्वारंटाईन असलेल्या खेळाडूंना निकृष्ट दर्जाचं जेवण

अर्थात सय्यद मुश्ताक अली करंडक या स्पर्धेसाठी काही संघ मुंबईत क्वारंटाईंन आहेत. या संघांच्या जेवणाची व्यवस्था हॉटेलकडून करण्यात आली आहे. मात्र या काही संघांकडून जेवणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे या संघांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी काही संघ मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. या ठिकाणी देण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत 3 संघांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याबाबत या 3 संघांकडून बीसीसीआयकडे तक्रार करण्यात आली आहे.

सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत अनेक संघ सहभागी होणार आहेत. या संघांना अनेक गृपमध्ये विभागण्यात आले आहे. या E ग्रृपमधील टीम या हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. ज्या हॉटेलमधून जेवणाबाबत तक्रार करण्यात आली, त्या ठिकाणी मुंबई, दिल्ली आणि केरळ संघ राहत आहेत. यामध्ये शिखर धवन, इशांत शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि धवल कुलकर्णी या सारखे स्टार खेळाडू थांबले आहेत. या ग्रृपमधील संघाच्या सामने मुंबईत खेळण्यात येणार आहेत.

नक्की तक्रार काय?

एका इंग्रजी वृत्तपत्राला यातील काही खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली. त्यानुसार “जेवण फार थंड होतं. तसेच नाश्त्याचा दर्जाही चांगला नव्हता. यानंतर हॉटेल प्रशासनाकडे याबाबत तक्रार करण्यात आली. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. यामुळे नाईलाज म्हणून या खेळाडूंनी बीसीसीआयकडे या सर्व प्रकाराची तक्रार केली. येथे मिळणारी पोळी ही पापडासारखी असेते. तसेच येथील भातामुळे वजन वाढण्याचा धोकाही आहे. खेळाडूंना आपल्या तब्येतीला जपावं लागतं. यामुळे बहुतेक खेळाडूंनी हा भात खाण्यास नकार दिला. येथील हॉटेलमधील जेवणाचे दरही फार जास्त आहेत. यामुळे आम्हाला बाहेरुन जेवण मागवण्याची परवानगी द्यावी”, अशी विनंतीही खेळाडूंकडून बीसीसीआयकडे करण्यात आली. मात्र कोरोनामुळे बीसीसीआयने ही विनंती फेटाळून लावली.

दरम्यान या तक्रारीनंतर हॉटेल शेफसोबत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत याबाबत तोडगा काढण्यात आला. हॉटेल प्रशासनाला पुन्हा जेवणाबाबत काही तक्रार येऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई टीमचे अरमान मलिक पीटीआय या वृत्तसंस्थेद्वारे दिली.

संबंधित बातम्या :

Syed Mushtaq Ali Trophy साठी मुंबईची घोषणा, सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व

श्रीशांत इज बॅक… 7 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवणार!

अर्जून तेंडुलकर मुंबईच्या संघात, पण निवडीवर का वाद?

Ind vs Aus: मेलबर्न रेस्टॉरंट प्रकरणानंतर टीम इंडियाची कोरोना टेस्ट, रोहित-पंतचा रिपोर्ट काय?

(Syed Mushtaq Ali Trophy players in coronavirus hit hotel in Chennai)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.