…म्हणून ‘तारक मेहता..’मधून दया बेन बाहेर

मुंबई: सब टीव्हीवरील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेला मोठा धक्का बसणार आहे. कारण ‘टप्पू की मम्मी’ आणि ‘सोसायटी की जान’ अर्थात ‘दया बेन’फेम अभिनेत्री दिशा वकानी या पुन्हा एकदा या मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. दिशा वकानी या 2017 साली मेटर्निटी लिव्हवर गेली होती. आता तर त्यांनी मालिकेलाच राम राम ठोकलं आहे. […]

...म्हणून 'तारक मेहता..'मधून दया बेन बाहेर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई: सब टीव्हीवरील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेला मोठा धक्का बसणार आहे. कारण ‘टप्पू की मम्मी’ आणि ‘सोसायटी की जान’ अर्थात ‘दया बेन’फेम अभिनेत्री दिशा वकानी या पुन्हा एकदा या मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. दिशा वकानी या 2017 साली मेटर्निटी लिव्हवर गेली होती. आता तर त्यांनी मालिकेलाच राम राम ठोकलं आहे.

30 नोव्हेंबर 2017 रोजी दिशा वकानी यांनी मुलीला जन्म दिला. त्यानंतर दिशा वकानी या मालिकेत परततील, अशी चाहत्यांना आशा होती. मात्र, दिशा वकानी यांनी मार्च 2018 पर्यंत आपली सुट्टी वाढवली आहे. मध्यंतरी काही सीन दिशा वकानी यांच्या घरी जाऊन शूट करण्यात आले. मात्र, ते तितके सोईचे नव्हते. त्यामुळे आधीचे काही सीन फिलर म्हणून वापरण्यात आले. मात्र, आता सर्वच अडचणीचे होऊन बसले आहे. वारंवार घरी जाऊन शूट करणं शक्य नाही. निर्मात्यांनी दिशा वकानी यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिशा वकानी मालिकेत परततील अशी काही चिन्हं दिसत नाहीत.

स्पॉटबॉय मासिकाच्या वृत्तानुसार, दिशा वकानी यांनी निर्मात्यांसमोर आपला वेळ आणि पैशांसंदर्भात काही अटी ठेवल्या होत्या, ज्या निर्मात्यांनी मानल्या नाहीत. त्यामुळे अखेर दिशा वकानी यांच्यासोबतचा करार संपवण्यात आला. असेही म्हटले जाते आहे की, दिशा वकानी यांच्या मालिकेत नसण्याने टीआरपीवर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे मालिकेतून त्यांच्या एक्झिटमुळे निर्मात्यांनाही काही फरक पडत नसल्याचे दिसत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.