Taimur Ali Khan | ‘रामायण’ बघायला आवडते, ‘पापा’ सैफकडून तैमूरच्या खास गोष्टी शेअर!

सैफने नुकतीच एका वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘तैमूरला रामायण बघायला आवडते’, असे त्याने म्हटले आहे.

Taimur Ali Khan | ‘रामायण’ बघायला आवडते, ‘पापा’ सैफकडून तैमूरच्या खास गोष्टी शेअर!
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 2:10 PM

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान (Taimur Saif Ali Khan) बर्‍याचदा चर्चेत असतो. त्याच्या ‘क्यूट स्टाईल’ला लोकांनी पसंती दिली आहे आणि म्हणूनच इन्स्टाग्रामवर त्याची छायाचित्रे नेहमी व्हायरल होत असतात. करिना आणि सैफही त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. माध्यमांच्या कॅमेराची नजरही तैमूरवर नेहमीच असते. मात्र, सैफ आणि करिना तैमूरला छायाचित्रकारांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच करतात. सैफने नुकतीच एका वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘तैमूरला रामायण बघायला आवडते’, असे त्याने म्हटले आहे. (Taimur loved to watch Ramayan says Saif Ali khan)

या मुलाखतीत सैफ अली खानने तैमूरविषयी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. त्यानंतर तैमूर (Taimur Saif Ali Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘तैमूरला रामायण पाहणे आवडते आणि विशेष म्हणजे तैमूर मालिका पाहून भगवान श्री रामांसारखा वागण्याचा प्रयत्न करत असतो’, असे सैफ अली खानने सांगितले आहे.

View this post on Instagram

❤? . . . . #SaifAliKhan #kareenakapoorkhan #taimuralikhan #kareenakapoor

A post shared by Saifalikhan ? (@saifalikhan_online) on

पुन्हा एकदा तैमूरची चर्चा

सैफ अली खानने नुकतीच रेडिफला खास मुलाखत दिली. याच मुलाखतीत त्याने तैमूरच्या सगळ्या खोड्या, त्याच्या आवडीनिवडी सांगितल्या. ‘तैमूरला टीव्ही मालिका पाहण्याची खूप आवड आहे. त्यातही ‘रामायण’ पाहण्यासाठी त्याची धडपड सुरू असते. ही मालिका पाहताना तो स्वतःला भगवान राम समजून, त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. या व्यतिरिक्त राजा आर्थर आणि तलवारी यांच्याविषयी ऐकणे त्याला खूप आवडते. करिना आणि मी त्याच्यासाठी अभ्यास करत असतो’, असे सैफने सांगितले. (Taimur loved to watch Ramayan says Saif Ali khan)

View this post on Instagram

⭐ . . . #saifalikhan #taimuralikhan #tim

A post shared by Saifalikhan ? (@saifalikhan_online) on

तैमूरची सतर्कता

सैफने त्याच्या मुलाखतीत पुढे सांगितले की, ‘तैमूर नेहमी कोरोना व्हायरस विषयी बोलत राहतो. स्वतः मास्क परिधान करून, इतरांनाही तसे करायला लावतो.’ तो आपल्या आजोबांसारखा क्रिकेटर होईल असे सैफला वाटायचे. मात्र, तैमूरला क्रिकेटमध्ये अजिबात रस नसल्याचे सैफ सांगतो.

लवकरच आणखी एक लहानगा सदस्य तैमूर अली खानच्या घरी येणार आहे. सैफ अली खान आणि करिना कपूर यांनी अलीकडेच त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची घोषणा केली होती.

संबंधित बातम्या : 

तैमुर दादा होणार!, ‘सैफिना’कडून गुड न्यूज

PHOTO : पतौडी पॅलेसमध्ये तैमूरला स्पॅनिशचे धडे, शिक्षिकेकडून क्यूट फोटो शेअर

आता तुमच्या मुलांसोबत ‘तैमूर’ही खेळायला येणार

(Taimur loved to watch Ramayan says Saif Ali khan)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.