तैवानने चीनचं विमान पाडल्याची चर्चा, घुसखोरीला रोखठोक उत्तर, अधिकृत घोषणेकडे लक्ष
चीनसोबत वाढत्या तणावाच्या दरम्यानच तैवानने चीनचं लढाऊ विमान पाडल्याची चर्चा सुरु आहे (Taiwan attack China fighter plane).
ताईपे : चीनसोबत वाढत्या तणावाच्या दरम्यानच तैवानने चीनचं लढाऊ विमान पाडल्याची चर्चा सुरु आहे (Taiwan attack China fighter plane). याबाबतच एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असं असलं तरी चीन किंवा तैवानने याला अजूनपर्यंत दुजोरा दिलेला नाही. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, तैवानने आपल्या क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या चीनच्या सुखोई-35 या लढाऊ विमानाला पाडलं आहे. याबाबत एक व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तैवानने या हल्ल्यासाठी अमेरिकेच्या पेट्रियाट मिसाईल डिफेन्स सिस्टमचा उपयोग केल्याचं बोललं जात आहे.
तैवानने चिनी विमानाला अनेकदा इशारा दिला. मात्र त्यानंतरही चीनचं युद्ध विमान तैवानच्या हद्दीत आल्याने तैवानने कारवाई केली, असा दावा केला जात आहे. या हल्ल्यात चिनच्या युद्धविमानातील वैमानिक जखमी झाला आहे, असंही सांगण्यात येत आहे. जर ही घटना घडली असेल तर येणाऱ्या काळात या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती तयार होण्याची शक्यता आहे.
#BrekingNews : #Taiwan air defence system shoots down #China #PLA – Airforce aircraft after intrusion into Taiwanese airspace. pic.twitter.com/Hs0qEOjfQK
— News Line IFE ?Live? (@NewsLineIFE) September 4, 2020
दरम्यान, चीनने मागील काही दिवसांमध्ये तैवानच्या हवाई क्षेत्रात आपले युद्धविमानं पाठवण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे तैवानने देखील चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. तैवानने यासाठी आपल्या सैन्याची सज्जता करण्यास देखील सुरुवात केली आहे. चीनकडून होणाऱ्या कोणत्याही आक्रमक कृतीचा सामना करण्यासाठी तैवानने आपल्या हवाई दल आणि नौदलाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांनी तैवानचं सैन्य दल अधिक शक्तीशाली करण्यासाठी राखीव सैन्य दलांना अधिक मजबूत करण्याची घोषणा केली आहे. यानुसार तैवानच्या सैन्याला मदतीला राखीव दलांना सज्ज केलं जाणार आहे. हे राखीव दल देखील इतर नियमित दलांप्रमाणेच शस्त्रांनी सुसज्ज असेल. त्यांच्याकडे तैवान सैन्यातील जवानांकडे असलेल्या सर्व शस्त्रांची कुमक पुरवली जाणार आहे.
हेही वाचा :
तैवानच्या अवकाशात अमेरिकेचे बॉम्बर युद्ध विमान, अमेरिकेचं चीनला आव्हान, तैवानच्या माध्यमांचा दावा
चीनने भूतानलाही डिवचले, सीमा वादावर कुणीही तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप न करण्याची भाषा
भारताशी भिडणाऱ्या चीनचा माज, तैवानमध्ये लढावू विमानांच्या घिरट्या, मात्र तैवाननेही टेन्शन वाढवलं
Taiwan attack China fighter plane