मुंबई : Tata Motors कंपनी 26 जानेवारीला एक नवीन गाडी लाँच करणार आहे. या 7 सीटर SUV चं नाव Tata Gravitas असं आहे. ही गाडी टाटाच्याच हॅरियरप्रमाणे (TATA Harrier) बनवण्यात आली आहे. परंतु Gravitas मध्ये तुम्हाला जास्त सीट्स मिळणार आहेत. कंपनीने जेव्हा हॅरियर लाँच केली होती तेव्हाच 7 सीटर व्हेरियंटबाबत घोषणा केली होती. आता ती कार लाँच केली जात आहे. (Tata Gravitas 7 seater SUV to be unveiled on Republic Day 2021)
कंपनीने जेव्हा 7 सीटर एसयूव्हीची घोषणा केली होती तेव्हा सांगितलं होतं की, गाडीचं नाव वेगळं जरी असलं तरी ही कार हॅरियरप्रमाणेच बनवली जाणार आहे. या गाडीमध्ये थोडेफार बदल केल जातील. दोन्ही एसयूव्ही ओमेगा प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आल्या आहेत. परंतु हॅरियर एक 5 सीटर एसयूव्ही आहे तर Gravitas ही 7 सीटर एसयूव्ही आहे.
या कारमध्ये सीट्सची एक एक्स्ट्रा रो (रांग) असेल. सीटच्या तिसऱ्या रांगेला जागा बनवण्यासाठी टाटाने हॅरियरच्या लांबीत 63 मीलीमीटर आणि उंचीत 80 मीलीमीटरची वाढ करुन Gravitas तयार केली आहे. त्यामुळे या गाडीची एकूण लांबी 4661mm इतकी झाली आहे तर रुंदी 1894mm आहे. गाडीची उंची 1741mm इतकी आहे. या गाडीचा व्हीलबेस 2741mm इतका आहे. Gravitas ही Harrier पेक्षा थोडी मोठी असली तरी दोन्ही कार्सच्या लुक्समध्ये फार फरक नाही.
इंजिन
गाडीच्या बाहेरील भागात अतिरिक्त कलर ऑप्शनसह एक लांब रियर ओव्हर हँग आणि एक स्टेप्ड छत ग्रेविटासला हॅरियरपेक्षा वेगळी कार सिद्ध करतं. सीट्सच्या तीन रांगेत एसयूव्ही साठी एक नवीन अलॉय व्हील डिझाईनसुद्धा या दोन्ही कार्समध्ये फरक असल्याचे सिद्ध करतं. ही नवी कार 170 हॉर्स पॉवर, 2.0 लीटर टर्बो डिझेल इंजिन, 6 स्पीड मॅन्यूअल आणि ६ स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स ऑप्शन सोबत येते.
किंमत
Gravitas ची किंमत 13 लाख ते 20 लाख रुपये असू शकते. टाटाची ही नवीन एसयूव्ही लाँच केली जाईल तेव्हा या गाडीची मार्केटमध्ये एमजी हेक्टर प्लस या कारसोबत टक्कर होईल. ही कार 6 सीटर आहे. या कारची किंमत 13.74 लाख रुपये ते 19.69 लाख रुपये इतकी आहे. या यादीत दुसरं नाव महिंद्रा XUV500 या कारचं आहे. या कारची किंमत 13.58 लाख रुपये ते 18.08 लाख रुपये इतकी आहे. टाटाची ही गाडी क्रेटालाही टक्कर देणार आहे.
टाटा अजून दोन कार लाँच करणार
टाटा मोटर्स कंपनी लवकरच आणखी दोन कार लाँच करणार आहे. टाटा अल्ट्रोज टर्बो (Tata Altroz Turbo) ही त्यामधील पहिली कार असेल. टाटा मोटर्सची प्रीमियम हॅच-बॅक कार अल्ट्रोज टर्बो पेट्रोल व्हेरिएंटमध्ये देण्यात आली आहे. 2021 मध्ये कंपनी अल्ट्रोज टर्बो पेट्रोल व्हेरिएंट लॉन्च करू शकते. भारतात या कारची चाचणी करण्याआधीच स्पॉट करण्यात आली आहे. या कारची किंमत सुमारे 8 लाख रुपये असू शकते.
टाटा अल्ट्रोज ईव्ही (Tata Altroz EV)
टाटा मोटर्स अल्ट्राझ हॅचबॅकचा खास इलेक्ट्रिक अवतार बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 30 किलोवॅट क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. तर ही कार फूल चार्च केल्यानंतर 350 किमी अंतर कापू शकते. या कारची किंमत सुमारे 10 लाख असू शकते.
हेही वाचा
Special Story | 2021 हे वर्ष एसयूव्हींचं, अनेक आघाडीच्या कंपन्या SUV लाँचिंगचा धडाका लावणार
बहुप्रतीक्षित 2021 Jeep Compass SUV फेसलिफ्ट 7 जानेवारीला लाँच होणार
मोठा वेटिंग पिरियड, तरिही डिसेंबरमध्ये Thar च्या 6500 युनिट्सचं बुकिंग; या कारमध्ये काय आहे खास?
(Tata Gravitas 7 seater SUV to be unveiled on Republic Day 2021)