अस्थीविसर्जनाहून परतताना काळाचा घाला, यवतमाळमध्ये अपघातात सात जणांचा मृत्यू

यवतमाळच्या जोडमाहो येथे टाटा मॅजिक वाहन झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला (Yavatmal accident) आहे.

अस्थीविसर्जनाहून परतताना काळाचा घाला, यवतमाळमध्ये अपघातात सात जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 17, 2020 | 7:28 AM

यवतमाळ : यवतमाळच्या जोडमाहो येथे टाटा मॅजिक वाहन झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला (Yavatmal accident) आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जोडमाहोजवळील कळंब पोलीस ठाण्याअंतर्गत वाढोणा खुर्द येथे हा अपघात (Yavatmal accident) घडला.

जोडमोहा येथील मृत बाबाराव वानखडे यांचे दुःखद निधन झाले होते. त्यामुळे त्यांचे सर्व नातेवाईक कोटेश्वर देवस्थान येथील नदीपात्रात अस्थी विसर्जनासाठी गेले होते. दरम्यान अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आटपून ते जोडमोहाकडे मॅक्झिमो वाहनाने परतत होते. याचदरम्यान सांयकाळी 5.30 वाजताच्या सूमारास जोडमोहा मार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन झाडाला धडकून थेट दरीत कोसळले.

या वाहनात एकूण 18 महिला आणि पुरुष प्रवासी होते. यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला तर वाहनातील सात ते आठ जण गंभीर जखमी असून अत्यावस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेंनंतर परिसरातील नागरीकांनी बचाव कार्यासाठी सूरूवात केली. या घटनेची माहिती मिळताच कळंबचे ठाणेदार विजय राठोड, यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार संजय शिरभाते, जिल्हा वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी गावकरी व नातेवाईकांनीही घटनास्थळ गाठून मदत कार्य केले. या घटनेने वानखेडे कुटुंबासह जोडमोहा गावात शोककळा पसरली आहे.

या अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

अपघातात मृत झालेल्यांची नावं

महादेव बावनकर (53) रा. शेंदुर्जना घाट, किसन कळसकर (55) रा. जोडमोहा, महादेव चंदनकर (58), गणेश चिंचोळकर (52) रा. महागाव, कृष्णा प्रसन्नकर (55), अंजना वानखेडे (69) सर्व रा. जोडमोहा, वाहन चालक अमर आत्राम (32) अशी अपघातात मृत झालेल्यांची नाव आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.