Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन Tata Safari चे फोटोज लीक, लाडक्या एसयूव्हीचा फर्स्ट लुक पाहा

टाटा मोटर्स कंपनी लवकरच भारतात त्यांचा ‘सफारी’ ब्रँड पुन्हा एकदा सादर करणार आहे.

नवीन Tata Safari चे फोटोज लीक, लाडक्या एसयूव्हीचा फर्स्ट लुक पाहा
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 11:13 AM

मुंबई : टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनी लवकरच भारतात त्यांचा ‘सफारी’ ब्रँड पुन्हा एकदा सादर करणार आहे. आधी या SUV चं नाव Gravitas असं ठेवण्यात आलं होतं. सर्वात आधी ही कार 2020 Auto Expo मध्ये सादर करण्यात आली होती. Tata ची ही फ्लॅगशिप SUV असेल आणि ही 7-सीटर कार असेल. ही कार या वर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटी लाँच केली जाईल. (Tata Safari first look revealed before launch tata plant pictures leaked)

या कारचे ऑफिशियल लाँचिंग होण्यापूर्वी कंपनीच्या प्लांटमधील या एसयूव्हीचे काही फोटोज लीक झाले आहेत. या फोटोजमध्ये टाटाच्या इतर मॉडेल्समध्ये नवीन टाटा सफारीसुद्धा दिसतेय. नवीन टाटा सफारी एसयूव्ही OMEGARC (Optimal Modular Efficient Global Advanced Architecture) प्लॅटफॉर्मवर बेस्ड असेल. जो लँड रोव्हर च्या D8 प्लॅटफॉर्मपासून घेण्यात आला आहे.

नवीन टाटा सफारीमध्ये खास बदल

=>> या एसयूव्हीमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. जसे की, प्रोडक्शन व्हर्जनमध्ये मोठे हनीकॉम्ब पॉटर आणि क्रोम हायलाईटसह एलईडी प्रोजेक्टर लाईट दिली जात आहे. =>> नवीन सफारीच्या इंजिन आणि डिझाईनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आता ही एसयूव्ही पूर्वीपेक्षा अधिक दमदार फिचर्ससह बनवली जात आहे. =>> या कारमध्ये सिग्नेचर-स्टाईल डुअल-टोन डॅशबोर्ड, 3-स्पोक स्टियरिंग व्हील, अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 8.8 इंचांची फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम, व्हॉईस रिकग्नायजेशन, 7-इंचांचा इंस्ट्रूमेंट पॅनल, प्रीमियम ओक मिळू शकतो. =>> या कारमध्ये तपकिरी रंगांची लेदर सीट आणि जेबीएलचे स्पीकर्स दिले जातील. =>> 2021 टाटा सफारी एसयूव्ही बीएस 6-कंप्लिट फिएट-सोर्सड 2.0-लीटर, 4-सिलेंडर डिझेल इंजिनद्वारे ऑपरेट होईल, जे 5-सीटर हॅरियर एसयूव्हीला पॉवर देतं. हे इंजिन 6-स्पीड मॅनुअल गियरबॉक्ससह 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरशी जोडलेलं असेल. =>> या गाडीमध्ये तुम्हाला एक्सटिरियर पेंट ऑप्शन आणि नवीन अलॉय व्हील्स मिळू शकतात. =>> नव्या अवतारातील एसयूव्हीमध्ये ग्राहकांना प्रवासाचा जबरदस्त अनुभव मिळेल. या कारचं डिझाईन, परफॉर्मन्स, मल्टी टास्किंग आणि अनेक प्रकारच्या सर्विसेसमुळे ही कार अधिक दमदार बनली आहे.

Tata Safari

Tata Safari

दरम्यान, या एसयूव्हीसाठी (Tata Safari) लवकरच प्री-लाँच बुकिंग सुरु केलं जाण्याची शक्यता आहे. ऑल-न्यू सफारी ही 5-सीटर हॅरियरचं व्हेरियंट आहे. ही कार 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. टाटा मोटर्सचे हेड शैलेश चंद्र त्यांच्या आगामी एसयूव्हीच्या ऑपचारिक ब्रँडिंगची घोषणा करताना म्हणाले की, “आम्हाला पुन्हा एकदा आमची एसयूव्ही-सफारी सादर करण्याची तयारी करत असताना खूप अभिमान वाटतोय आणि तितकाच आनंदही होत आहे.

हेड शैलेश चंद्र म्हणाले की, सफारी एक मजबूत आणि प्रतिष्ठित ब्रँड आहे. देशातील ग्राहकांनी दोन दशकांहून अधिक काळ या कारला पसंती दिली आहे. या कारचा नवीन अवतार अधिक दमदार आहे. या कारची रचना, कार्यक्षमता, मल्टी टास्किंग, सेवा आणि दीर्घकाळ टिकणारी डेव्हलपमेंट क्वालिटी या एसयूव्हीला पूर्वीपेक्षा अधिक दमदार बनवते. आता आम्हाला या कारच्या लाँचिंगची प्रतीक्षा आहे.”

हेही वाचा

Renault गाड्यांवर 65 हजारांपर्यंत सूट; ट्रायबर, क्विड आणि डस्टरचा समावेश

भारतीय मार्केटमध्ये टाटाच्या ‘या’ छोट्या SUV चा धुमाकूळ, विक्रीमध्ये 21 टक्क्यांची वाढ

(Tata Safari first look revealed before launch tata plant pictures leaked)

विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.