शिक्षकांचा प्रताप, विद्यार्थ्यांना शाळेतच बलात्काराचे प्रात्यक्षिक
आंध्र प्रदेशच्या एका सरकारी शाळेत दोन शिक्षकांवर बलात्काराचे प्रात्यक्षिक (Rape Demo) दाखवण्याचा आरोप करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील आहे.
हैदराबाद : शाळेतच विद्यार्थ्यांकडून बलात्काराचे प्रात्यक्षिक (Rape Demo) करुवून घेतल्याचा प्रताप सरकारी शाळेतील शिक्षकांनी केला आहे. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. या घटेमुळे संतप्त ग्रामस्थांनी आरोपी दोन शिक्षकांना बेदम मारहाण केली. यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. “चिंतलपुडी मंडलमध्ये झालेल्या घटनेची सत्यता तापसण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे”, असं शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशातील शाळेत बलात्काराचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी विद्यार्थिनीचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. शिक्षकांनीच हे प्रात्यक्षिक करण्यास सांगितलं होतं. मात्र या प्रकरणाचा तपास जिल्हा शिक्षण अधिकारी आणि मंडल शिक्षण अधिकाऱ्यांनी केली असता, त्यांनी असा प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे.
“अशा प्रकारची एकही घटना घडली नाही. तिसरीतील तीन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले होते. ज्यामध्ये दोन मुलं आणि एका मुलीचा समावेश होता. त्यामुळे मुलीला जखम झाली आहे. बलात्काराच्या प्रात्यक्षिकासाठी विद्यार्थिनीचा वापर केला असा काही पुरावा मिळालेला नाही”, असं मंडल शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी सीवी रेणुका यांना पाठवलेल्या अहवालात म्हटलं आहे.
“मी स्वत: शनिवारी (3 ऑगस्ट) शाळेला भेट देणार आहे. नेमकं वर्गात काय घडलं याची माहिती करुन घेईन”, असं जिल्हा शिक्षण अधिकारी सीवी रेणुका यांनी सांगितले.
चिंतलपुडी पोलिसांसोबत संपर्क केला असता अजूनपर्यंत शिक्षकांविरोधात एकही तक्रार दाखल झालेली नाही.