Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejashwi Yadav | ….. तर तेजस्वी यादव शरद पवारांचा विक्रम मोडणार?

एक्झिट पोलच्या अदांजानुसार महाआघाडीची सत्ता आली तर तेजस्वी यादव बिहारचे आणि भारतातील एखाद्या राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत. (Tejashwi Yadav became youngest cm of bihar If exit poll predictions translate into exact results )

Tejashwi Yadav | ..... तर तेजस्वी यादव शरद पवारांचा विक्रम मोडणार?
विविध संस्थांचे एक्झिट पोल्स जर एक्झॅट ठरले तर तेजस्वी यादव आपल्या मुरब्बी राजकारणाची झलक दाखवण्याबरोबरच अनेक नेत्यांचे रेकॉर्ड मोडित काढतील, हे नक्की...
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 12:20 PM

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 15 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या नितीशकुमार यांच्या विरोधात राजदचे युवा नेते तेजस्वी यादव यांनी महाआघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तेजस्वी यादव यांच्या झंझावाती प्रचारामुळं महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.  विविध संस्थांच्या एक्झिट पोल्समध्ये RJD आणि काँग्रस महाआघाडीला सत्ता मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलच्या अदांजानुसार महाआघाडीची सत्ता आली तर तेजस्वी यादव बिहारचे आणि भारतातील एखाद्या राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत. (Tejashwi Yadav became youngest cm of bihar If exit poll predictions translate into exact results )

बिहारचे सर्वात तरुण मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा सतिश प्रसाद सिंह यांच्या नावावर आहे. सतिश प्रसाद सिंह जानेवारी 1968 मध्ये वयाच्या 32 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते. डॉ.जगन्नाथ मिश्रा  एप्रिल 1975 मध्ये 38 व्या वर्षी बिहारचे मुख्यमंत्री झाले होते.

एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर तेजस्वी यादव देशातले सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरतील. प्रफुल्लकुमार महंतो वयाच्या 34 व्या वर्षी आसामचे मुख्यमंत्री झाले होते. नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला 38 व्या वर्षी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव 38 व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते.

बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांसाठी निवडणूक झाली आहे. तेजस्वी यादव यांनी बिहार निवडणुकीत विक्रमी 247 प्रचारसभा घेतल्या आहेत. तेजस्वी यादव यांचा आज 31 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त RJDच्या कार्यकर्त्यांनी बिहारमध्ये अनेक ठिकाणी पोस्टर लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, तेजस्वी यादव यांचा वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आज RJD कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केलेली पाहायला मिळत आहे. पोस्टरवर तेजस्वी यादव यांचा भावी मुख्यमंत्री आणि कृष्णावतार असा उल्लेख केला आहे.

दरम्यान, 2015 च्या विधानसभा निवडणुकीत  राजद (80), जदयू (71), भाजप ( 53) आणि काँग्रेसने (27) जागांवर विजय मिळवला होता.

एक्झिट पोलचे अंदाज

Tv9 महाएक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 110 ते 120

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 115 ते 125

लोजप – 3 ते 5

अन्य – 10 ते 15

ABP न्यूज -सीव्होटरचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 104 ते 128

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 108 ते 131

रिपब्लिक टीव्ही- जनकी बातचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 91 ते 117

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 136 ते 138

टाईम्स नाऊ-सीव्होटरचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 116

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 120

लोजप – 1

अन्य – 6

संबंधित बातम्या:

Tejashwi Yadav Birthday | वय अवघं 31 वर्षे, थेट मुख्यमंत्रिपदावर दावा, तेजस्वी यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Bihar Exit Poll: ‘तेजस्वी’ लाटेचा चिराग पासवान यांनाही मोठा फटका; ‘किंगमेकर’ का होऊ शकले नाहीत?; पाहा एक्झिट पोलचे आकडे

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.