Tejashwi Yadav LIVE News and Updates: तेजस्वी यादवांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगणार? ‘एनडीए’चे कमबॅक, महागठबंधनला टाकले मागे
बिहारमध्ये सुरुवातीचे कल हाती आले असून त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे महागठबंधनने आघाडी घेतली आहे. आगामी काळात हे कल कायम राहणार का, हे पाहावे लागेल. | Tejashwi Yadav
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत झंझावाती प्रचार करुन मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे सगळे डावपेच निष्प्रभ ठरवणारे राष्ट्रीय जनता दलाचे नेते (राजद) तेजस्वी यादव यांचे आज काय होणार, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. मतदानोत्तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (bihar election results 2020 live updates)
We will see you in a few hours and will prove that we did what we had said: Manoj Jha, RJD MP
The RJD-led Mahagathbandhan is ahead on 103 seats, behind NDA which is leading on over 125 seats. #BiharElectionResults pic.twitter.com/tlsatW1FR4
— ANI (@ANI) November 10, 2020
[svt-event title=”तेजस्वी यादवांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगणार?” date=”10/11/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ] मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आघाडीवर असलेली महागठबंधन आता पिछाडीवर पडली आहे. तर भाजपप्रणित एनडीएने आता जवळपास 119 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी 122 जागांची गरज आहे. [/svt-event]
[svt-event title=”तेजस्वी यादव यांच्या विजयाचे संकेत” date=”10/11/2020,9:06AM” class=”svt-cd-green” ] मतमोजणी सुरु झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधनला मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. त्यामुळे राजद समर्थकांना विजयाची खात्री पटली आहे. त्यामुळे राजदचे कार्यकर्ते तेजस्वी यादव यांच्या घराबाहेर मासे घेऊन जमले आहेत. बिहारमध्ये मासा शुभ मानला जातो. त्यामुळे हे समर्थक तेजस्वी यांच्या घराबाहेर मासे घेऊन येत आहेत. [/svt-event]
Patna: Supporters of RJD leader Tejashwi Yadav outside his residence as counting of votes for #BiharElection2020 is underway pic.twitter.com/VvJAlZg8uv
— ANI (@ANI) November 10, 2020
[svt-event title=”राघोपुर मतदारसंघातून तेजस्वी आघाडीवर” date=”10/11/2020,8:46AM” class=”svt-cd-green” ] बिहार निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले असून त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे महागठबंधन आघाडीवर आहे. तर मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव हेदेखील राघोपुर मतदारसंघात आघाडीवर आहेत. [/svt-event]
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 10, 2020
[svt-event title=”31 जागांचे कल हाती” date=”10/11/2020,8:24AM” class=”svt-cd-green” ] 31 जागांचे कल हाती, भाजप 11 जागांवर आघाडीवर, तर राजदची 19 जागांवर सरशी, जेडीयू, काँग्रेस प्रत्येकी एक-एक जागेवर पुढे [/svt-event]
तेजस्वी भवः बिहार!
— Tej Pratap Yadav (@TejYadav14) November 10, 2020
Patna: Strong room established at Anugrah Narayan College being opened, as counting of votes for Bihar Assembly elections to begin at 8 am pic.twitter.com/ezv9fOtHyF
— ANI (@ANI) November 10, 2020
[svt-event title=”राघोपूर मतदारसंघाकडे जनतेचे लक्ष” date=”10/11/2020,7:28AM” class=”svt-cd-green” ] तेजस्वी यादव हे राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) पारंपरिक मतदारसंघ असलेल्या राघोपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तेजस्वी यादव यांची सध्याची लोकप्रियता पाहता राघोपूरमधून ते विक्रमी मताधिक्याने विजयी होणार का, हे पाहावे लागेल. [/svt-event]
[svt-event title=”बिहार निवडणुकीच्या मतमोजणीला 8 वाजता सुरुवात ” date=”10/11/2020,7:26AM” class=”svt-cd-green” ] आज सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. राज्यातील 55 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. कोरोना पाहता मागील वेळेपेक्षा यावेळी अधिक मतमोजणी केंद्रे तयार केली गेली आहेत. बिहारमधील 38 जिल्ह्यांतील 55 मतमोजणी केंद्रे आणि 414 हॉलमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. [/svt-event]
2014 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?
राजद – 80 काँग्रेस – 27 जदयू – 71 भाजप – 53 लोजप – 2 रालोसप – 2 हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1 एकूण जागा – 243
यंदाच्या निवडणुकीत कोणाच्या किती रॅली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी- 12 मुख्यमंत्री नितीश कुमार- 100 तेजस्वी यादव- 251 चिराग पासवान- 103 राहुल गांधी- 8 असदुद्दीन ओवैसी- 100
बिहारमध्ये कुणाचं सरकार? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी
Tv9 महाएक्झिट पोल
भाजप + जदयू – एनडीए – 110 ते 120
राजद + काँग्रेस – महागठबंधन – 115 ते 125
लोजप – 3 ते 5
अन्य – 10 ते 15
ABP न्यूज -सीव्होटरचा एक्झिट पोल
भाजप + जदयू – एनडीए – 104 ते 128
राजद + काँग्रेस – महागठबंधन – 108 ते 131
रिपब्लिक टीव्ही- जनकी बातचा एक्झिट पोल
भाजप + जदयू – एनडीए – 91 ते 117
राजद + काँग्रेस – महागठबंधन – 136 ते 138
टाईम्स नाऊ-सीव्होटरचा एक्झिट पोल
भाजप + जदयू – एनडीए – 116
राजद + काँग्रेस – महागठबंधन – 120
लोजप – 1
अन्य – 6
संबंधित बातम्या:
Bihar Election Exit Poll : तेजस्वी तळपले, मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती
‘तेजस्वी यादव यांचा उत्साह फक्त उद्या सकाळपर्यंत, बिहारमध्ये सत्ता एनडीएचीच येणार’, भाजपचा दावा
…तर तेजस्वी यादव बिहारचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरणार, पवारांचा तो विक्रम मोडीत काढणार?
(bihar election results 2020 live updates)