Revanth Reddy Love Story | काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या भाचीवर जडलेला रेवंत रेड्डींचा जीव, तेलंगणाच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांची ‘प्रेम कहाणी’

Revanth Reddy Love Story : रेवंत रेड्डी यांनी केसीआर यांची हॅट्रीक हुकवल्याने देशभरात त्यांची जोरदार चर्चा आहे. रेड्डी यांना सत्तांतर करण्यासाठी जेवढी मेहनत घेतली तेवढीच मेहनत लग्नासाठी घ्यावी लागली होती. चित्रपटाच्या कथेसारखीच रेवंत रेड्डी यांची प्रेम कहानी आहे.

Revanth Reddy Love Story | काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या भाचीवर जडलेला रेवंत रेड्डींचा जीव, तेलंगणाच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांची 'प्रेम कहाणी'
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 4:25 PM

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका 2023 उरकल्या यामध्ये भाजपने तीन राज्यांवर कब्जा केला. तर काँगेसला फक्त तेलंगणा राज्यात सत्ता प्रस्थापित करता आली. काँग्रेससाठी तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी उत्तम निभावली. केसीआर यांच्या बीआरएसला धक्का देताना काँग्रेसच्या विजयाचे ते शिल्पकार ठरले. काँग्रेसनेही रेवंत रेड्डी यांना त्यांच्या मेहनतीचं फळ दिलंय. रेवंत रेड्डी उद्या म्हणजेच 7 डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून तेलगंणाचे दुसरे मुख्यमंत्री होणार आहेत.

रेवंत रेड्डी यांची लव स्टोरी

रेवंत रेड्डी नागार्जुन धरणाजवळ बोट राईड करत असताना त्यांनी एक तरूणीला पाहिलं होतं. तिला पाहतच रेवंत रेड्डी तिच्या प्रेमात पडले होते. मात्र ही तरूणी काही सर्वसामान्य नव्हती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांची भाची गीता होती. शेवटी त्यांनी गीता यांच्यासोबतच लग्न केलं पण त्यासाठी त्यांना मजबूत प्रयत्न केले.

रेवंत रेड्डी यांनी त्यावेळी उस्मानिया विद्यापीठातून फाईन आर्ट्सची पदवी घेतली होती. लग्नासाठी त्यांनी गीता यांच्या घरी मागणी घातली. मात्र गीता यांच्या घरून नकार कळवण्यात आलेल. पण हार मानतील ते रेवंत रेड्डी कसले, त्यांनी गीता यांच्याशीच 7 मे 1992 मध्ये विवाह केला. रेवंत रेड्डी आणि गीता यांंना एक मुलगी असून तिचं नाव निमिषा आहे. निमिषा हिचं 2015 साली रेड्डी मोटर्सचे मालक जी वेंकट रेड्डी यांचा मुलगा सत्यानारायण रेड्डी यांच्याशी 2015 ला विवाह झाला होता.

दरम्यान, रेवंत रेड्डी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1969 मध्ये आंध्र प्रदेशमधील महबूबानगर येथे झाला होता. विद्यार्थी असतानाच रेवंत रेड्डी यांनी राजकारणामध्ये सहभाग घेतला होता. अभविपमधून रेवंत रेड्डी यांनी आपल्या राजकारणाला सुरूवात केला होती. त्यानंतर चंद्राबाबा नायडू यांच्या तेलगू देसम या पक्षामध्ये ते सामील झाले. त्यानंतर 2009 मध्ये आंध्र प्रदेशच्या कोडंगल विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा निवडून आलेले. 2014 साली टीडीपीचे सभागृह नेते म्हणूनही त्यांची निवड झाली होती.

तीन वर्षांनंतर रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. तेलंगणात 2018 साली विधानसभा निवडणुका लागल्या त्यावेळी त्यांचा टीआरएसच्या उमेदवाराने पराभव केला होता. काँग्रेसने 2019 साली परत लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना तिकीट दिलं आणि ते निवडूनही आले होते. 2021 मध्ये काँग्रेसने थेट प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली होती. दोन ते तीन वर्षात काँग्रेसचा चेहरा बनून तेलंगणामध्ये त्यांनी जोरदार काम केलं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसलला सत्तेत आणण्याचं काम त्यांनी केलं.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.