Uday Kiran Birth Anniversary | सहा वर्षापूर्वी ‘या’ अभिनेत्याचाही सुशांतप्रमाणे गळफास, तेच कारण, तेच वय, तशीच आत्महत्या!
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला अवघे काही दिवस लोटले असताना उदय किरणच्या जन्मदिवशी चाहत्यांनी त्याची प्रकर्षाने आठवण काढली. #UdayKiran ही ट्विटरवर ट्रेंड झाला. (Telugu Actor Uday Kiran Birth Anniversary fans remember resemblance with Sushant Singh Rajput)
मुंबई : सर्वात कमी वयात ‘फिल्मफेअर’ची बाहुली पटकवण्याचा मान मिळवलेला तेलुगु अभिनेता उदय किरण याचा आज (26 जून) जन्मदिवस. 2014 मध्ये वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी उदय किरणने आत्महत्या केली होती. त्याच्या निधनाला सहा वर्ष उलटल्यानंतरही चाहते त्याला विसरलेले नाहीत. सोशल मीडियावर त्याचे पुण्यस्मरण केले जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे नुकतीच आत्महत्या करणारा बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आयुष्याशी असलेले त्याचे साधर्म्य. (Telugu Actor Uday Kiran Birth Anniversary fans remember resemblance with Sushant Singh Rajput)
उदय किरणचा जन्म 26 जून 1980 रोजी तेलुगु भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने टॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. 2001 मध्ये त्याला ‘नुवु नेनु’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (तेलगू) ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला. तमिळ अभिनेता कमल हासन यांच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पटकावणारा तो सर्वात तरुण अभिनेता ठरला होता.
चिरंजीवीच्या मुलीसोबत साखरपुडा मोडला
2003 मध्ये, म्हणजे वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी उदय किरणचा साखरपुडा दिग्गज अभिनेता चिरंजीवीची मुलगी सुष्मिताशी झाला, परंतु काही कारणाने साखरपुडा मोडला. साक्षात चिरंजीवीच्या लेकीशी लग्न मोडल्याने उदयच्या करिअरमध्ये उलथापालथ झाल्याचंही दबक्या आवाजात बोललं जाई. मात्र त्याची बहीण श्रीदेवीने या अफवा निराधार असल्याचं म्हटलं होतं.
हेही वाचा : सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल, गुदमरुन मृत्यू झाल्याचा निष्कर्ष
“उदयचं एका तरुणीसोबत ब्रेकअप झालं होतं. त्यामुळे तो प्रचंड अस्वस्थ होता. तो तिच्या आठवणीत रडायचा. मात्र चिरंजीवी यांनी खूप सहकार्य केलं. ते उदयला गॉडफादरप्रमाणे होते. एके दिवशी ते स्वतः कन्या सुश्मिताशी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले. आपल्या मुलीला उदय आवडत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं” असं त्याची बहीण श्रीदेवीने एका मुलाखतीत म्हटलं होतं.
डिप्रेशन आणि लग्न
उदयने तेलुगुऐवजी तमिळ सिनेसृष्टीत स्वत: निर्मिती करण्याचाही प्रयत्न केला. मात्र जवळपास वर्षभर आर्थिक संकटात असल्यामुळे उदयला डिप्रेशन आल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2012 रोजी त्याने विशिताशी लग्न केले.
गळफास घेऊन आत्महत्या
लग्नाला उणेपुरे सव्वा वर्ष झाले असताना 5 जानेवारी 2014 रोजी उदयने आत्महत्या केली. पत्नी कामानिमित्त बाहेर गेली असताना उदय किरणने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. त्यावेळी उदय किरण नैराश्यात असल्याचं बोललं जातं.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला अवघे काही दिवस लोटले असताना उदय किरणच्या जन्मदिवशी चाहत्यांनी त्याची प्रकर्षाने आठवण काढली. #UdayKiran ही ट्विटरवर ट्रेंड झाला.
उदयही सुशांतप्रमाणे स्वयंभू किंवा सेल्फ मेड स्टार होता. कंपूशाहीचा फटका उदयलाही बसल्याचा दावा काही चाहते करतात. केवळ दोन मोठे पुरस्कार. फारसे मोठ्या निर्मात्यांचे चित्रपट नाही, अशी सुशांतसारखी अवस्था. त्याच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट नसलं, तरी सुशांतप्रमाणेच त्यानेही डिप्रेशनमधून टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हणतात.
Both are talented and self made actors. Both ended life in same way and reason for death is 80% matched.
Miss u #SushantSinghRajput and #UdayKiran.
Happy birthday #UdayKiranBirthAnniversary pic.twitter.com/VjA4rO3djh
— sai_manikanta_dhfm (@OyeLuckySai) June 26, 2020
(Telugu Actor Uday Kiran Birth Anniversary fans remember resemblance with Sushant Singh Rajput)