VIDEO: हातोड्याने अंडे फोडले, सुरीने ज्यूस कापला, गोठलेल्या थंडीत जवानांची झुंज
जगातील सर्वात उंच ठिकाण आणि सर्वात कठीण युद्धभूमी असलेल्या सियाचीनमधील भारतीय सैनिकांचा व्हिडीओ समोर आला आहे.
श्रीनगर : भारतीय जवान कोणत्या परिस्थितीत देशाच्या सीमेचं रक्षण करतात, याचा व्हिडीओ समोर आला आहे. जगातील सर्वात उंच ठिकाण आणि सर्वात कठीण युद्धभूमी असलेल्या सियाचीनमधील भारतीय सैनिकांचा हा व्हिडीओ आहे. बर्फाने व्यापलेल्या या प्रदेशात हवामान कधी मृत्यूचं कारण बनेल सांगता येत नाही. इथले वातावरण थोडेथोडके नव्हे तर तब्बल वजा 50 डिग्रीपर्यंत घसरतं. अशा परिस्थितीत भारतीय जवान सियाचीनध्ये कसे राहात असतील त्याची केवळ कल्पनाच केलेली बरी.
अतिशय थंड हवेमुळे हाडं गोठणारी थंडी सियाचीनमध्ये असते. अशावेळी खाण्या-पिण्याचे पदार्थ तोंडात जाण्यापूर्वीच गोठलेले असतात. इथलं वातावरण इतकं गोठलं आहे की, जवानांना अंडी चक्क हातोड्याने फोडावी लागत आहे. भारतीय जवान बटाटे, टोमॅटो, अंडी गोठल्याने ती हातोड्याने फोडत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. स्वत: जवानांनीच हा शूट करुन परिस्थितीचं वर्णन केलं आहे.
या व्हिडीओमध्ये एक जवना अंडी, टोमॅटो, बटाटे हातोड्याने फोडताना दिसतो. शिवाय ज्यूसचं पाकिटही गोठल्यामुळे, ते चाकूने कापावं लागलं.
अतिशय संघर्षपूर्ण वातावरणात हे सर्व पदार्थ खाण्यायोग्य करण्यातच जास्त मेहनत होते. अशा परिस्थितीतही न झुकता, न डगमगता भारतीय जवान सीमेचं रक्षण समर्थपणे करत आहेत. भारतीय जवानांच्या या धैर्याला सलाम!
VIDEO:
Just Glimpse of our #Brave Soldiers food at the height of 18000 feet( Somewhere at Siachen- South Glacier), Temp -30.after this u feel more proud coz they r there fr us. #JayMaakali.
Highly Motivated and Brave Daredevil of @adgpi. @indiatvnews pic.twitter.com/YQABdJ9ZGq
— Manish Prasad (@manishindiatv) June 8, 2019