प्रत्येक गोष्टीसाठी सहकार्य करायला तयार, सौदीही दहशतवादाविरोधात भारतासोबत

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी आम्ही भारतासोबत असल्याचं जाहीर केलं. आता सौदी अरेबियानेही दहशतवादाविरोधात प्रत्येक गोष्टीसाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. सौदीचे क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी भारत दौऱ्यावर असताना दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबत असल्याचं स्पष्ट केलं. आम्ही इंटेलिजेन्सपासून ते इतर अनेक गोष्टींपर्यंत भारताला साथ देऊ, असं मोहम्मद बिन सलमान यांनी सांगितलं. […]

प्रत्येक गोष्टीसाठी सहकार्य करायला तयार, सौदीही दहशतवादाविरोधात भारतासोबत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी आम्ही भारतासोबत असल्याचं जाहीर केलं. आता सौदी अरेबियानेही दहशतवादाविरोधात प्रत्येक गोष्टीसाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. सौदीचे क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी भारत दौऱ्यावर असताना दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबत असल्याचं स्पष्ट केलं. आम्ही इंटेलिजेन्सपासून ते इतर अनेक गोष्टींपर्यंत भारताला साथ देऊ, असं मोहम्मद बिन सलमान यांनी सांगितलं.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला. दहशतवादाला बळ देणाऱ्या देशांवर दबाव तयार करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. दहशतवादाविरोधात एका मजबूत कार्ययोजनेची गरज आहे, जेणेकरुन तरुण भरकटणार नाहीत. मला आनंद आहे की आपले विचार याबाबतीत मिळतेजुळते आहेत. दहशतवाद रोखणे, समुद्र सुरक्षा आणि सायबर सिक्युरिटी याबाबतीत दोन्ही देशांचे संबंध आणखी चांगले होतील. आमच्या निमंत्रणाला मान देऊन भारतात आल्याबद्दल प्रिन्स यांचे आभार, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली.

क्राऊन प्रिंस म्हणाले, “हा माझा पहिलाच भारत दौरा आहे. यापूर्वी मी भारतात आलो आहे, पण शिष्टमंडळासह पहिल्यांदाच आलोय. आपलं रक्ताचं नातं आहे आणि ते जुनं आहे. आपल्या हिताचे मुद्दे एकच आहेत. सौदीमध्ये तुम्ही 2016 मध्ये आलात तेव्हापासून आपण अनेक गोष्टींमध्ये यश मिळवलंय. सौदीने 44 बिलियन डॉलर गुंतवणुकीसाठी तयारी दाखवली आहे. आम्ही भारतासोबत सहकार्य करायला तयार आहोत.”

सौदीच्या नागरिकांसाठी ई व्हिजाचा विस्तार केला जात असल्याचं मोदींनी सांगितलं. भारतीयांच्या हज यात्रेच्या कोट्यात वाढ केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. 2.7 मिलियन भारतीयांच्या सौदीतील शांतीपूर्व भागीदारीबद्दल आम्ही आभार मानतो, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली.

सौदीची धोरणं ही मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियासाठी पूरक असल्याचंही मोदी म्हणाले. पायाभूत सुविधांमध्ये सौदी भारतात गुंतवणूक करणार आहे. यापूर्वी क्राऊन प्रिन्स यांनी पाकिस्तानचा दौरा करत तिथे 20 बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीच्या करारावर स्वाक्षरी केली होती. यानंतर भारतात येत यापेक्षा दुप्पट गुंतवणुकीवर शिक्कामोर्तब केलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.