मार्क झुकरबर्गलाही मागे टाकत टेस्लाचे सीईओ मस्क जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत, एकूण संपत्ती किती?

जगप्रसिद्ध कंपनी स्पेसएक्स आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनाही मागे टाकले आहे.

मार्क झुकरबर्गलाही मागे टाकत टेस्लाचे सीईओ मस्क जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत, एकूण संपत्ती किती?
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 5:58 PM

वॉशिंग्टन : जगप्रसिद्ध कंपनी स्पेसएक्स आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनाही मागे टाकले आहे. ते आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. एलन मस्क यांच्याकडे सध्या एकूण 110 अब्ज डॉलर संपत्ती आहे (Tesla CEO Elon Musk become worlds 3rd richest person Bloomberg billionaire index).

ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या (Bloomberg Billionaire Index) यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस (Jeff Bezos) हे असून त्यांच्याकडे एकूण 185 अब्ज डॉलर संपत्ती आहे. तर 129 अब्ज डॉलर संपत्तीसह मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आता एलन मस्क यांनी झेप घेतलीय. मार्क झुकरबर्ग 104 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. बर्नार्ड अर्नाल्ट 102 अब्ज डॉलर संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

एलन मस्क काही दिवसांपूर्वी त्यांच्या कोरोना चाचणीवरुन चांगलेच चर्चेत आले होते. त्यांची कोरोना चाचणी एकाच दिवसात पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह आली होती. एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स सध्या अनेक यशस्वी मोहिमा करत आहे. नुकतेच स्पेसएक्सने ‘रेजिलिएंस’ नावाचं स्पेसएक्स क्रू ड्रॅगन अंतराळ यान, 4 अंतराळवीरांना घेऊन फ्लोरिडाहून फाल्कन 9 रॉकेटच्या मदतीने लॉन्च झाले. या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर एकाच दिवसात हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर पोहचलं. ही मोहिम नासाच्या 6 सर्टिफाईड क्रू मोहिमेंपैकी एक होतं. ही मोहिम स्पेसएक्स कंपनीच्या ‘कमर्शियल क्रू प्रोग्राम’चा भाग होती.

याशिवाय एलन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी टेस्ला 2021 मध्ये भारतीय बाजारात प्रवेश करण्यास तयार आहे. एलन मस्क यांची संपत्ती एकाच दिवसात 7.61 अब्ज डॉलरने म्हणजेच जवळपास 50 हजार कोटीपेक्षा अधिकने वाढली आहे. सर्वसामान्यपणे मस्क यांची संपत्ती प्रतिवर्षी 82 अब्ज डॉलरने वाढते. एकूण नफ्याचा विचार केला तर टॉप-500 बिलिनिअरपैकी एलन मस्क यांना यावर्षी सर्वात जास्त नफा झालाय. नफ्यात मस्क यंदा सर्वात पुढे आहेत.

संबंधित बातम्या :

जगभरात उद्योग बुडाले, मात्र लॉकडाऊनमध्येही ‘या’ तीन उद्योजकांची चांदी

दररोज नव्हे तर आठवड्यातून 12 तासच काम, ‘अलिबाबा’च्या श्रीमंतीचा नवा फंडा

Tesla CEO Elon Musk become worlds 3rd richest person Bloomberg billionaire index

शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.