ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; सीमाभागातील मराठी बांधवांसाठी 1 नोव्हेंबरला काळ्या फिती लावून कामकाजाचा निर्णय

१ नोव्हेंबर हा कर्नाटकचा स्थापना दिवस आहे. मात्र, सीमाभागातील मराठी बांधव ही तारीख 'काळा दिवस' म्हणून साजरी करतात. | Thackeray govt

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; सीमाभागातील मराठी बांधवांसाठी 1 नोव्हेंबरला काळ्या फिती लावून कामकाजाचा निर्णय
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 6:57 PM

मुंबई: सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबरला महाविकासआघाडी सरकारमधील (Mahvikas Aghadi govt) सर्व मंत्री काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. १ नोव्हेंबर हा कर्नाटकचा स्थापना दिवस आहे. मात्र, सीमाभागातील मराठी बांधव ही तारीख ‘काळा दिवस’ म्हणून साजरी करतात. यंदा राज्य सरकारने सीमावासियांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी काळ्या फिती लावून कामकाज करायचे ठरवले आहे. (Thackeray govt will support Marathi community in Karnataka)

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती. तेव्हापासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय केला जात आहे. सीमाभागात असणारी मराठी भाषिक गावे अनेक मार्गांनी महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, कर्नाटक सरकार त्यांची आंदोलने आणि प्रयत्न अन्यायाने दडपून टाकते. ही गावे महाराष्ट्रात येण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरु आहे. महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठिशी उभे आहे. यंदा आम्ही सीमाभागातील या मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी मंत्रिमंडळासमोर एक प्रस्ताव ठेवला होता. छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. यानंतर सर्व मंत्र्यांनी हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला. त्यानुसार 1 नोव्हेंबरला आम्ही मंत्री काळ्या फिती लावून मराठी भाषिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागातील मराठी गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्याचा मुद्दा खितपत पडला आहे. दोन्ही राज्यांमध्ये वेगवेगळी सरकारं येऊनही अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. शिवसेनेकडून अधूनमधून सीमाभागातील मराठी भाषिकांचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र, त्यापलीकडे ठोस असे काही घडताना दिसत नाही. या भागात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून वेळोवेळी सीमावासियांच्या महाराष्ट्रातील समावेशाच मुद्दा उचलून धरला जातो. मात्र, आजपर्यंत कर्नाटक सरकारने या ना त्या मार्गाने मराठी भाषिकांवर निर्बंध घालण्यात धन्यता मानली आहे.

इतर बातम्या:

फडणवीसांना महाराष्ट्रात खूप कामे, मी मोकळाच; संजय राऊत, कधी येता कर्नाटकला? : नारायण राणे

Shivaji Maharaj | कुठं पुतळ्याचं दहन, तर कुठं कर्नाटक सरकारला बांगड्यांचा‌ हार, शिवभक्त आक्रमक

केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकातही यांचंच सरकार, तरीही पाणी सोडलं नाही : संभाजी भिडे

(Thackeray govt will support Marathi community in Karnataka)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.