ठाकरे गटाला मोठा हादरा, आणखी एक बडा नेता सोडून चालला
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूकात उद्धव ठाकरे यांच्या गटाला कमी जागा मिळाल्यानंतर तसेच ठाणे आणि कोकण या बालेकिल्ल्यात मोठे अपयश आल्याने ठाकरे गटाला अनेक नेते आणि कार्यकर्ते सोडून जात आहेत. आता आणखी एक मोठा नेता ठाकरे गटाला सोडचिट्टी देत आहेत.
विधानसभा निवडणूकांत झालेल्या मानहाणीकारक पराभवातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष बाहेर पडायचं नावच घेत नसल्याचे उघड झाले आहे. ठाकरे गटाचे एकामागून एक मोहरे पक्षाला सोडचिट्टी देत आहेत. ठाकरे गटातील कोकणचे नेते राजन साळवी हे सध्या ठाकरे गटात अस्वस्थ असताना आता आणखी एक बडा नेता ठाकरे गटाला सोडून चालला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याचे नावच घेत नसल्याचे उघड झाले आहे. कोणता नेता ठाकरे गटाला सोडून चालला आहे ते पाहूयात….
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते उध्दव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबायचे काही नावच घेत नसल्याचे उघड झाले आहे. काल कोकणचे नेते राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्री येथे खंडाजंगी झाल्याची चर्चा असताना आता ठाकरे गटाचा बडा नेता ठाकरे यांना सोडचिट्टी देत आहे. ठाकरे गटाचे धुळे जिल्ह्याचे सह संपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात हिलाल माळी सहभागी होते. त्यांनी असा निर्णय घेतल्याने ठाकरे गटाला धुळ्यात मोठा हादरा बसल्याचे म्हटले जात आहे.
धुळे जिल्ह्यात ठाकरे गटाला हादरा
ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी हे ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिलाल माळी यांचा ठाण्यात शिवसेनेत प्रवेश होत आहे. हिलाल माळी यांचे धुळे शहर आणि ग्रामीण मतदारसंघांमध्ये मोठं काम आहे. शिवसेनेच्या अनेक मोठ्या आंदोलनात हिलाल माळी यांचा सहभाग होता. हिलाल माळी यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांना धुळे ग्रामीणमध्ये मिळेल मोठं बळ मिळणार आहे. हिलाल माळी यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे ठाकरे यांच्या गटाला धुळे जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. हिलाल माळी यांना धुळे ग्रामीणमध्ये उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हिलाल माळी यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, शहरातील विविध समित्यांवर असलेले कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.