बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत थलपती विजयचा ‘मास्टर’ ठरला सर्वात फेव्हरेट चित्रपट

तामिळ चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार विजयच्या 'मास्टर' या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे.

बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत थलपती विजयचा ‘मास्टर’ ठरला सर्वात फेव्हरेट चित्रपट
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 5:10 PM

मुंबई : तामिळ चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार विजयच्या ‘मास्टर’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे विजयचे चाहते डोळे लावून बसले आहेत. त्यातच विजयचं फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चाललंय. गेल्या काही काळात विजयने केलेले सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्ट्सनुसार विजयचा अपकमिंग चित्रपट ‘मास्टर’बाबत 2020 या वर्षात सर्वाधिक ट्विट करण्यात आले आहेत. प्रदर्शनापूर्वीच ‘मास्टर’ ट्विटरवर हिट ठरला आहे. (Thalapathy Vijay Master tops list of most Tweeted movie of 2020)

‘मास्टर’ या चित्रपटात थलापती विजयसोबत अभिनेता विजय सेतूपती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘मास्टर’ हा चित्रपट दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नसली तरी काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार 2021 मध्ये पोंगल या सणाच्या दिवशी ‘मास्टर’ प्रदर्शित केला जाऊ शकतो.

विजयच्या ‘मास्टर’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून दोन्ही विजयच्या (विजय सेतूपती आणि थलापती विजय) चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सूकता आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून #master हा हॅशटॅग अनेकदा ट्विटरवर ट्रेंड झाला आहे. चित्रपटाबाबतची प्रत्येक अपडेट मिळाल्यानंतर #master हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत होता.

‘मास्टर’ या चित्रपटाने ट्विटरच्या ट्रेंड लिस्टमध्ये सर्वात वरचं स्थान पटकावलं आहे. विजयच्याच ‘सरकार’ आणि ‘बिगिल’ या दोन चित्रपटांच्या नावांचे हॅशटॅग्स 2018 आणि 2019 मध्ये ट्विटरच्या टॉप ट्रेंडिग यादीत पहिल्या स्थानावर होते. तर या यादीवर यंदाही विजयनेच वर्चस्व गाजवलं आहे. यंदा #master हा हॅशटॅग ट्विटरच्या ट्रेंड लिस्टमध्ये टॉपला आहे.

पोंगलच्या दिवशी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. दरम्यान काही दिवसांपूर्वी अशी अफवा पसरली होती की ‘मास्टर’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न होता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. परंतु या सर्व अफवांचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी खंडण केले आहे.

एक्सबी फिल्म क्रिएटर्स कंपनीने नुकतेच एक अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “आपला देश अजूनही कोरोना महामारीशी लढत आहे. आम्हाला आशा आहे की, तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि ठिक आहात. मास्टर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित केला जावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे”.

“तुमची एक्साईटमेंट आम्ही समजू शकतो. त्या मोठ्या दिवसाची (चित्रपटाच्या प्रदर्शनाची) आम्हालाही प्रतीक्षा आहे. तुमच्याप्रमाणे आम्हीदेखील वाट पाहतोय. चित्रपटाबाबत गेल्या काही दिवसांमध्ये ज्या अफवा पसरल्या आहेत, त्या सर्व खोट्या आणि चुकीच्या आहेत. आम्ही लवकरच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करणार आहोत”.

इतर बातम्या

Thalaivi : ‘थलायवी’चं शूटिंग पूर्ण, जयललीता यांचा फोटो शेअर करत कंगनाचं भावनिक ट्विट

Birthday Special : दिवसाला 40 अंडी आणि 8 तास व्यायाम, भल्लालदेवच्या भूमिकेसाठी राणाची खास मेहनत

Rajinikanth B’day Special : एवढ्या गोष्टी करा आणि सुपरस्टार रजनीएवढं फिट व्हा!

(Thalapathy Vijay Master tops list of most Tweeted movie of 2020)

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.