ठाणे : कोरोना काळातही ठाण्यात सर्रास हुक्का पार्लर सुरु आहेत. ठाण्यातील उपवन परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे सोशल डिस्टन्सिंग आणि महामारी काळामुळे अनेक वैध व्यवसाय बंद पडले आहेत. तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पण अवैध व्यवसायांना हे लागू पडत नाही, असंच दिसतं आहे. तर दुसरीकडे मंदिरं बंद असतानाही हुक्का पार्लर चालू असल्याचे मनसेने उघड केले आहे. (Thane Hukka Parlor Working in Covid Situation)
ठाण्यातील उपवन परिसरात ठाणे महापौर बंगल्याला लागून असलेल्या एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याचा पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे. मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी या हुक्का पार्लरमध्ये सुरु असलेला सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. ज्यामुळे ठाण्यात कोरोना काळातही सर्रास हुक्का पार्लर सुरु आहेत, हे समोर आलं आहे.
ठाण्यातील उपवन परिसरातील कॅफे कोयला असं या हुक्का पार्लरच नाव आहे. या हुक्का पार्लरमध्ये अनेक तरुण-तरुणी हुक्का ओढताना दिसत आहे. या हुक्का पार्लरमध्ये हुक्क्यासोबतच अनेक नशेचे पदार्थही मिळतात. यात हुक्का पार्लरवर राजकीय वरदहस्त असल्याची शंकाही मनसेकडून उपस्थितीत केली जात आहे.
एकीकडे मंदिरे बंद आहेत. अनेक वैध व्यावसायिकांना नियमांमुळे त्यांचे व्यवसाय सुरु करता येत नाहीत. ठाण्यात हुक्का पार्लर कोणाच्या वरदहस्ताने सुरु आहे, हे उघड झालचं पाहिजे, अशी मागणी मनसेने केली आहे. (Thane Hukka Parlor Working in Covid Situation)
संबंधित बातम्या :
पनवेल आरटीओला लॉकडाऊनचा फटका, उत्पन्नात 130 कोटींची घट
फ्लॉवर 120, कोथिंबीर 100 तर टोमॅटो 80 रुपये किलो, नागपुरात भाजीपाल्याचे दर गगनाला