एअर फोर्सने सरकारला पुरावे दिले, 80 टक्के बॉम्ब अचूक निशाण्यावर
नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यानंतर, देशभरात विरोधी पक्षाकडून पुराव्याची मागणी केली जात होती. मात्र आता या हल्लाचे फोटो रॉयटर्स न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केले आहेत. भारतीय वायूसेनेने हल्ला केलेल्या पाकिस्तानातील बालाकोट परिसराचे फोटो सॅटेलाईटद्वारे काढण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय वायूसेनेने एअरस्ट्राईक संदर्भातील अनेक पुरावे भारत सरकारकडे सोपवले आहेत. यामध्ये एअरस्ट्राईकच्या फोटोंचाही […]

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यानंतर, देशभरात विरोधी पक्षाकडून पुराव्याची मागणी केली जात होती. मात्र आता या हल्लाचे फोटो रॉयटर्स न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केले आहेत. भारतीय वायूसेनेने हल्ला केलेल्या पाकिस्तानातील बालाकोट परिसराचे फोटो सॅटेलाईटद्वारे काढण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय वायूसेनेने एअरस्ट्राईक संदर्भातील अनेक पुरावे भारत सरकारकडे सोपवले आहेत. यामध्ये एअरस्ट्राईकच्या फोटोंचाही समावेश असल्याचे म्हटलं जात आहे.
भारतीय वायूसेनेने हल्ला केल्यानंतर अनेकांनी पुराव्याची मागणी केली. वायूसेनेने सरकारला 12 पानांचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये वायूसेनेने बालाकोटमधील हाय रिजोल्यूशनचे फोटोही दिले आहेत. दरम्यान वायूसेनेने दिलेला रिपोर्ट मोदी सरकार सर्वांसमोर सादर करणार का? याबद्दल अजून काही माहिती मिळालेली नाही.
वायूसेनेच्या माहितीनुसार, बालाकोटमध्ये 80 टक्के निशाणे अचूक लागल्याचे बोललं जात आहे. जे बॉम्ब टाकण्यात आले ते बॉम्ब बालाकोटमध्ये असलेल्या इमारतींच्या आतामध्ये गेले आहेत. यामुळे जे काही नुकसान झालं आहे ते इमारतींच्या आतमध्ये झालं आहे.
26 फेब्रुवारीच्या पहाटे एअर स्ट्राईक
14 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मद ने पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एअरस्ट्राईक करत तेथील दहशतवादी तळ उडवण्यात आले. एअरस्ट्राईकमध्ये मिराज-2000 विमानांचा वापर करण्यात आला होता. मात्र पाकिस्तान सतत दावा करत होते की आमचे काही नुकसान झालेले नाही फक्त काही झाडे पडली आहेत.