शेतकऱ्याच्या मुलाने केला दिग्गज उद्योगपती बिर्ला यांचा पराभव, देशभरात गाजली निवडणूक

काँग्रेसने मोरारका यांच्याऐवजी शिवनाथ सिंग गिल यांना उमेदवारी दिली. गिल हे गुढागौडजी भागातील गिलों की धानी येथील रहिवासी होता. त्याचे वडील शेतकरी होते. तर, दुसरीकडे गिल यांच्याविरोधात उभे होते केके बिर्ला.

शेतकऱ्याच्या मुलाने केला दिग्गज उद्योगपती बिर्ला यांचा पराभव, देशभरात गाजली निवडणूक
kk birla and shivnath gilImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 9:27 PM

नवी दिल्ली : देशभरात निवडणुकांचे वातावरण आहे. सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीत अनेक विक्रम मोडीत निघतील. तर काही नवे विक्रम प्रस्थापित होतील. अनेक श्रीमंत उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. तर काही उमेदवार लोकवर्गणी जमा करून त्यातून निवडणुकीसाठी लागणारा खर्च करत आहेत. मात्र, एका निवडणुकीची चर्चा देशात अजूनही होते. कारण ती निवडणूक ऐतिहासिक अशीच होती. देशभरात नावाजलेल्या एका अत्यंत श्रीमंत उद्योगपतीचा पराभव झाला होता. त्या उद्योगपतीचा पराभव करणारा उमेदवार मात्र एक साधा शेतकरी होता.

1971 मध्ये झालेली निवडणूक ऐतिहासिक होती. राजस्थानचा झुंझुनू लोकसभा मतदारसंघात एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते. यात प्रमुख लढत होती ती दिग्गज उद्योगपती कृष्ण कुमार बिर्ला (केके) आणि शेतकऱ्याचा मुलगा असलेले शिवनाथ सिंग गिल यांच्यामध्ये. झुंझुनू लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राधेश्याम आर मोरारका यांनी 1952 ते 62 पर्यंत तीन वेळा निवडणूक जिंकली होती. मात्र, चौथ्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला.

1971 मध्ये काँग्रेसने मोरारका यांच्याऐवजी शिवनाथ सिंग गिल यांना उमेदवारी दिली. गिल हे गुढागौडजी भागातील गिलों की धानी येथील रहिवासी होता. त्याचे वडील शेतकरी होते. तर, दुसरीकडे गिल यांच्याविरोधात उभे होते केके बिर्ला. घनश्यामदास बिर्ला या देशातील अव्वल उद्योगपतींचा तो मुलगा. महात्मा गांधी यांच्या जवळचे अशीही घनश्यामदास बिर्ला यांची ओळख होती. मात्र, बिर्ला यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक न लढविता स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे झुंझुनू येथील या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

निकाल लागला तेव्हा एका शेतकऱ्याने उद्योगपतीला हरवले असा गदारोळ संपूर्ण देशात झाला. शिवनाथ सिंग गिल यांनी सुमारे एक लाख मतांच्या फरकाने उद्योगपती बिर्ला यांचा पराभव केला होता. गिल यांना 2 लाख 23 हजार 286 मते तर बिर्ला यांना 1 लाख 24 हजार 337 मते मिळाली होती. त्या निवडणुकीनंतर गिल हे बिर्ला पच्छाड खासदार म्हणून ओळखले जाऊ लागले.

शिवनाथ सिंग गिल यांच्या या ऐतिहासिक विजयानंतर मात्र त्यांची राजकीय कारकीर्द फारशी पुढे गेली नाही. जनतेने गिल यांच्यावर विश्वास ठेवून बिर्ला यांचा पराभव केला. पण, दुसऱ्यांदा जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. पुढच्याच लोकसभा निवडणुकीत 1977 मध्ये ते कन्हैयालाल यांच्याकडून 1.25 लाखांहून अधिक मतांनी पराभूत झाले. पहिल्या पराभवानंतर केके बिर्ला यांनी यानंतर कधीही झुंझुनूमधून निवडणूक लढवली नाही. मात्र, 1984 ते 2002 अशी सलग अठरा वर्षे ते राज्यसभा सदस्य होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.