एका रात्रीत कुटुंब उद्ध्वस्त झालं…मुलांना ठेवलं पण आई-वडिलांचा घेतला बळी…

दुर्दैवी घटनेत छबू सीताराम गवारे (वय 35) आणि मंदा छबू गवारे यांचा मृत्यू झाला आहेत तर तीन मुली आणि एक मुलगा वाचला आहे. दरम्यान घटनास्थळी देवळाली कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

एका रात्रीत कुटुंब उद्ध्वस्त झालं...मुलांना ठेवलं पण आई-वडिलांचा घेतला बळी...
Image Credit source: The house collapsed due to heavy rain and the husband and wife died under it
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 3:04 PM

नाशिक : मुसळधार पावसाने नाशिककर (Nashik) अक्षरशः हैराण झालेले असतांना एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. गणेश विसर्जनाच्या ( Ganeshvisarjan ) दिवशीच ही घटना घडल्याने अनेकांच्या डोळ्याच्या कडा या पाण्याने ओल्या झाल्या आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस होत असतांना भगूर-देवळाली जवळ असलेल्या वंजारवाडी गावात एक घर कोसळले. त्यात मुलांचा जीव वाचला पण पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू (Died) झाला आहे. त्यामुळे वंजारवाडी येथील गवारे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्दैवी घटनेत छबू सीताराम गवारे आणि मंदा छबू गवारे यांचा मृत्यू झाला आहेत, तर तीन मुली आणि एक मुलगा यांचा जीव वाचला आहे. दरम्यान घटनास्थळी देवळाली कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

घटनेचे माहिती स्थानिक आमदार सरोज अहिरे यांना मिळताच यांनी गवारे कुटुंबाच्या घराकडे धाव घेतली, घटनेची माहिती घेत सरकारकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

हे सुद्धा वाचा

छबू गवारे हे पत्नी मंदा यांना घेऊन मोलमजुरी करत आपला उदरनिर्वाह करत होते. तीन मुली आणि एक मुलगा असा त्यांचे कुटुंब होते. मात्र नियतीने त्यांच्या कुटुंबावर घात केला. मुसळधार पावसाने गवारे दाम्पत्याचा बळी घेतला.

गवारे दाम्पत्यांना तीन मुली आहेत त्यापैकी मोठी मुलगी ही नववीला शाळेत आहेत. तर दोन मुली या प्राथमिक शिक्षण घेत असून एक मुलगा हा पाच वर्षांचा आहे. नकळत्या वयात चिमूरड्यांवरील आई वडिलांचे छत्र उडालय.

गवारे दाम्पत्यांचा अंत्यविधी लोकप्रतिनिधींच्या आणि गावकरांच्या सहकाऱ्याने पार पडला असला तरी प्रशासकीय अधिकारी देखील घटनास्थळी पोहचत माहिती घेत आहे. अनाथ झालेल्या या मुलांना आता शिक्षण, राहणे आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी कुणाकडे द्यायची याबाबत माहिती घेतली जात आहे.

स्थानिक आमदार सरोज अहिरे यांनी शासनाच्या गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू केलेल्या शेतकरी अपघात योजनेचा लाभ आणि शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्याच्या बाबत प्रयत्न करणार असल्याची भूमिका टीव्ही 9 शी बोलतांना दिली आहे.

गवारे कुटुंब ही आदिवासी असल्याने त्या मुलांना आश्रमशाळेत ठेऊन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी शासन पातळीवर घेता येईल का ? याबाबत देखील आमदार अहिरे या प्रयत्नशील आहे.

घडलेली घटना बघून संपूर्ण गावच नव्हे पंचक्रोशी सुन्न झाली आहे. लहान-लहान मुलं असल्याने आपले आई वडील मृत्यू झाले आहेत याची देखील कल्पना नसल्याने मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.