विनोदी अभिनेता किकू शारदाविरोधात 50 लाखांच्या फसवणुकीचा आरोप

द कपिल शर्मा शो अभिनेता किकू शारदासह पाच जणांनी ट्रस्टच्या माध्यमातून आपली 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप एका कला दिग्दर्शकाने केला आहे. मात्र किकूने आपल्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत.

विनोदी अभिनेता किकू शारदाविरोधात 50 लाखांच्या फसवणुकीचा आरोप
Follow us
| Updated on: Aug 06, 2019 | 2:57 PM

मुंबई : ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ (Comedu Nights with Kapil) या कार्यक्रमात ‘पलक’च्या भूमिकेमुळे गाजलेला विनोदी अभिनेता किकू शारदा (Kiku Sharda) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किकूसह पाच जणांनी 50 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप कला दिग्दर्शकाने केला आहे.

कला दिग्दर्शक नितिन कुलकर्णी यांनी मुंबईतील अंबोली पोलिसात किकू शारदासह पाच जणांविरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

द मुंबई फेस्ट (The Mumbai Fest) नावाच्या ट्रस्टच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप आहे. किकू शारदा या ट्रस्टशी निगडीत असल्याने त्याचं नावही एफआयआरमध्ये आहे. तक्रारदार आणि आरोपी यांच्यात समन्वयाच्या अभावामुळे ही रक्कम शिल्लक असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

किकू शारदाने मात्र आपल्यावरील आरोप नाकारत नितीन कुलकर्णींवरच उलट आरोप केले आहेत. ‘मी ‘द मुंबई फेस्ट’ या ट्रस्टचा सदस्य नाही. मी केवळ त्यांच्या इव्हेंट्समध्ये सहभागी झालो होतो. माझे वडील या ट्रस्टचे मेंबर आहेत. माझं नाव विनाकारण या प्रकरणात गोवलं जात आहे’ असा दावा किकूने केला आहे.

यापूर्वी राम रहीमची खिल्ली उडवल्याबद्दल किकू शारदाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. किकू शारदा सध्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये बच्चा यादव ही भूमिका साकारत आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.