अयोध्येत येऊनही ‘या’ पंतप्रधानांना रामलल्लांचं दर्शन घेताच आलं नाही
याआधी भारताचे काही पंतप्रधान अयोध्येला आले, मात्र त्यांनी रामजन्मभूमीला भेट देऊन राम लल्लांचं दर्शन घेतलं नाही (List of PM who not visit Ram Lalla Temple).
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (5 ऑगस्ट) अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराचं भूमिपूजन करुन मंदिराची पायाभरणी केली. विशेष म्हणजे मागील 70 वर्षांच्या इतिहासात नरेंद्र मोदी देशाचे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी अयोध्येला येऊन रामलल्ला यांचं दर्शन घेतलं. याआधी काही भारतीय पंतप्रधान अयोध्येला आले, मात्र त्यांनी रामजन्मभूमीला भेट देऊन राम लल्लांचं दर्शन घेतलं नाही (List of PM who not visit Ram Lalla Temple). त्यावेळी हे प्रकरणही न्यायप्रविष्ट होतं.
इंदिरा गांधी
देशाच्या स्वातंत्र्यांनंतर प्रथमच पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी 1966 मध्ये अयोध्येचा दौरा केला होता. अयोध्येत नव्या घाटावर बांधलेल्या सरयू पुलाचं लोकार्पण करण्यासाठी इंदिरा गांधी अयोध्येला आल्या होत्या. त्यावेळी हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या पुन्हा माघारी परतल्या. यानंतर दुसऱ्यांदा त्या 1979 मध्ये अयोध्या दौऱ्यावर आल्या होत्या. तेव्हा त्यांनी हनुमान गढी येथे जाऊन बजरंगबलींचं दर्शन घेतलं आणि पूजा अर्चना केली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
इंदिरा गांधी तिसऱ्यांदा 1975 मध्ये अयोध्येला आल्या. त्यावेळी आचार्य नरेंद्रदेव कृषि आणि औद्योगिक विश्वविद्यालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाचं निमित्त होतं. त्यांनी विश्वविद्यालयाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि त्यानंतर थेट दिल्लीला परतल्या. या तिन्ही भेटींमध्ये इंदिरा गांधींनी रामलल्ला जन्मभूमीपासून अंतर ठेवणंच पसंत केलं.
राजीव गांधी
राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी दोन वेळा आणि माजी पंतप्रधान म्हणून एकदा अशा एकूण तीन वेळा अयोध्येला भेट दिली. राजीव गांधी पंतप्रधान असतानाच 1986 मध्ये बाबरी मशिदीचं कुलुप उघडण्यात आलं. 1989 मध्ये राम मंदिराची पायाभरणी झाली. 1984 मध्ये राजीव गांधींनी अयोध्येत निवडणूक सभेलाही संबोधित केलं होतं.यानंतर 1989 च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींनी अयोध्येतूनच आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली.
यानंतर राजीव गांधी विरोधी पक्षात असताना 1990 मध्ये एका सद्भावना यात्रेच्या निमित्ताने अयोध्येत आले. त्यावेळी त्यांनी रामलल्ला यांचं दर्शनही घेतलं नाही आणि पूजाही केली नाही. दुसरीकडे राहुल गांधी यांनी 2016 मध्ये आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी 2019 मध्ये हनुमान गढीवर जाऊन बजरंगबलींचं दर्शन घेत पूजा केली होती.
अटल बिहारी वाजपेयी
अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील आपल्या आयुष्यात रामलल्ला आणि बजरंगबलींचं दर्शन घेतलं नाही किंवा पूजा केली नाही. 2003 मध्ये मंदिर आंदोलनाचे प्रमुख चेहरा असलेल्या रामचंद्रदास परमहंस यांच्या निधनानंतर वाजपेयी अयोध्येत आले होते. त्यावेळी त्यांनी शरयू नदीच्या किनाऱ्यावरच परमहंस यांना आदरांजली वाहिली.
संबंधित बातम्या :
List of PM who not visit Ram Lalla Temple