लॉटरीचा क्रमांक चक्क तिच्या स्वप्नात दिसला, मग तिने जिंकले 40 लाखांचे बक्षिस
नशीब मेहरबान असेल तर काही घडू शकते अगदी छप्पर फाडके पैशांची बरसात होऊ शकते.एका महिलेला चक्क स्वप्नात लॉटरीच्या लकी नंबरचा दृष्टांत झाला आणि तिने लकी ड्रॉ जिंकल्याची घटना घडली आहे.
काहीजण लॉटरीचे तिकीट काढून आपले नशीब आजमावत असतात. एखाद्या भाग्यवान ग्राहकालाच बक्षिस लागते आणि लाखो लोकांचा वेळा पैसा वाया जातो. परंतू अमेरिकेतल्या प्रिन्स जॉर्ज काऊंटी परिसराच्यामध्ये एका महिला रहिवाशाने पिक फाईव्ह ड्रॉच्या लॉटरी ड्रॉमध्ये 50,000 डॉलर्सचे ( सुमारे 42.96 लाख रुपये ) बक्षीस जिंकले. आश्चर्यकारकारक बाब म्हणजे हा लॉटरी जॅक पॉटचा क्रमांक तिला तिच्या स्वप्नात दिसला होता. त्यामुळे तिच्या स्वप्नाने तिला या क्रमांकाचे तिकीट खरेदी करण्यास प्रवृत्त केले होते आणि नेमका हा जॅकपॉट तिला लागल्याचे उघड झाल्याने सगळीकडे तिच्या स्वप्नातील दृष्टांताची चर्चा सुरु आहे.
या भाग्यवान महिला विजेत्याने मेरीलँड लॉटरी अधिकाऱ्यांना सांगितले की डिसेंबरमध्ये मला एक अनोखे स्वप्न पडले होते, ज्यामध्ये आकड्यांचा एक विशिष्ट क्रम होता. त्यामुळे हा आकडा त्यांच्या लक्षात राहीला आणि त्यांनी ऑक्सन हिल झिप इन मार्टमधून 9-9-0-0-0 या क्रमांकांचा वापर करून पिक फाईव्हचे तिकीट खरेदी केले.
त्या घटनेची आठवण करून देताना या महिलेन सांगितले की, ‘ मी ही संधी जवळजवळ गमावलीच होती. आम्ही उशिरा पोहचलो होतो आणि मी जॅक पॉट खेळायला जवळजवळ विसरलेच होते.पण माझ्या नीट लक्षात होते की माझ्या स्वप्नात आलेले ते नंबर खेळायचे आहेत. 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी जाहीर झालेल्या सोडतीत जेव्हा या नंबरनी मला पन्नास हजार डॉलरचे बक्षीस मिळवून दिले तेव्हा माझा निर्णय योग्य होता याची मला खात्री पटली,’ असे त्या म्हणाल्या.
पतीला विश्वासच बसला नाही..
माझ्या पत्नीने जेव्हा ही बातमी मला सांगितली तेव्हा मला सुरुवातीला खरे वाटले नाही. परंतू जेव्हा नशिबात असते तेव्हा असे घडू शकते. त्यामुळे आमच्या नशीबाचे मी आभार मानतो असे पतीने म्हटले आहे. हे जोडपे अजूनही त्यांना मिळालेल्या या पैशांचा वापर कसा करायचा याचा विचार करीत आहे. या पैशाचे तिला जे हवे ते तिने करावे असे विजेता महिलेच्या पतीने म्हटले आहे.आम्ही आमच्या नातवंडांना आधीच एक विशेष ख्रिसमस गिफ्ट दिले आहे असेही त्यांनी सांगितले.
लकी कुपनमुळे सुखद धक्का
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सिंगापूर येथील भारतीय वंशाच्या बालासुब्रमण्यम चिदंबरम यांना लकी ड्रॉमध्ये $1 दशलक्ष ( ₹8.45 कोटी ) चे बक्षीस लागल्याने ते एका रात्रीत करोडपती झाले. तीन महिन्यांपूर्वी मुस्तफा ज्वेलरी या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या दुकानातून त्याने त्याच्या पत्नीसाठी सोन्याची साखळी खरेदी केली तेव्हा त्याला लकी कुपनमुळे सुखद धक्का बसला. नंतर संबंधित दुकानदाराने बालासुब्रमण्यम चिदंबरम याने बक्षीस जिंकल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. त्यामुळे चिदंबरमला या बोनस बक्षिसाने अत्यानंद झाला आणि आश्चर्यही वाटले.