‘कितीही दबावतंत्र वापरले तरी ‘झटका मोर्चा’ होणारच’ मनसे भूमिकेवर ठाम

कितीही दबावतंत्र वापरले तरी मनसेचा मोर्चा होणारच अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे. (MNS increased electricity bill)

'कितीही दबावतंत्र वापरले तरी 'झटका मोर्चा' होणारच' मनसे भूमिकेवर ठाम
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 10:34 PM

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीजबिलाविरोधात राज्यात राजकारण तापलेलं आहे. राज्य सरकारने नागरिकांचे वाढीव वीजबिल माफ करावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कितीही दबावतंत्र वापरले तरी मनसेचा (MNS) मोर्चा होणारच अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे. (The MNS taken a firm stand on march against increased electricity bill)

वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने मुंबईमध्ये गुरुवारी (26 नोव्हेंबर) मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी मनसेने खास तयारी सुरु केली आहे. मनसेने वातावरण निर्मितीस सुरुवात केली आहे. त्यासाठी मनसेकडून शहरात ठिकठिकाणी बॅनर, होर्डिंग्ज लावण्यात येत आहेत. विषेश म्हणजे मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाच्या परिसरातदेखील बॅनर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समद्ये वीजबिल न आलेल्या मंत्र्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

यावेळी याबद्दल विचारले असता, “मनसेचा गुरुवारी (26 नोव्हेंबर) वाढीव वीजबिलाविरोधात आयोजित करण्यात आलेला मोर्चा कुठल्याही परिस्थितीत होणारच. कितीही दबाबवतंत्र वापारले तरी हा मोर्चा होणारच. मनसेच्या मोर्चाबाबत नेत्यांमध्ये कसलाही संभ्रम नाही,” असे मनसे नेते अखिल चित्रे यांनी सांगितले.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात वाढीव बीजबिल आल्याने राज्य सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावं लागलेलं आहे. याच मुद्द्यावरुन भाजपनेदेखील सरकारवर चांगलीच टीका केली. भाजपने सरकारविरोधात 23 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन केले होते. यावेळी भाजपने राज्यभर वीजबिलाची होळी करत जनतेचे वीजबिल माफ करण्याची मागणी केली होती. तसेच, जर कोणी वीज कापायला आले, तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना विरोध करतील, असा इशाराही भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. त्यानंतर आता वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

या पूर्वीही मनसेची पोस्टरबाजी

वीजबिल माफीच्या विरोधात मनसेने दंड थोपाटले आहेत. याआधीही मनसेने वाढीव वीजबिलाविरोधात पोस्टरबाजी केली होती. मुंबईतील दादर, माहीम या भागात मनसेने 22 नोव्हेंबरला ठिकठिकाणी पोस्टर्स लावले होते. ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘तीन तिघाडा, लाईट बिघाडा’, अशा घोषणा या होर्डिंगवर लिहून सरकारवर निशाणा साधण्यात आला होता.  शिवाय शॉकसाठी तयार राहा, असा इशारा देत मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं होतं.

संबंधित बातम्या :

वाढीव वीजबिलाविरोधात मनसेची पोस्टरबाजी; पोलीस, बेस्ट प्रशासनाने होर्डिंग्ज हटवले

BJP Protest for Electricity Bill Relief | वाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी वीजबिल होळी आंदोलन

वीजबिल माफीसाठी गरज पडल्यास खळ्ळखट्यॅक आंदोलन करणार, मनसे आक्रमक

(The MNS taken a firm stand on march against increased electricity bill)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.