दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता! मुंबई महापालिका प्रशासनाच्या तयारीचा आदित्य ठाकरेंकडून आढावा
कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासनाची प्रशासनाची तयारी आहे का? रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत का? याचा आढावा मंत्री आदित्य ठाकरे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला. कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये ओपीडी सुरु करणार असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
मुंबई: राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर मुंबईसह राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासनाच्या तयारीबाबत आढावा घेतला. मुंबई महापालिका प्रशासनातील अधिकारी आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. (The possibility of another wave of corona, a review of preparations by Aditya Thackeray)
कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासनाची प्रशासनाची तयारी आहे का? रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत का? याचा आढावा मंत्री आदित्य ठाकरे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला. कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये ओपीडी सुरु करणार असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. त्याचबरोबर मोफट टेस्टिंग सेंटरवरही जादा कर्मचारी आणि अन्य सुविधा पुरवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
…तर कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते: मुख्यमंत्री
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, असा इशारा देतानाच मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाची दुसरी लाट
पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जनसंपर्क अधिक असलेले व्यावसायिक, घरगुती कामगार, शासकीय कर्मचारी हे सुपर स्प्रेडरमध्ये येतात. या सुपर स्प्रेडरमुळेच कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींचे सर्वेक्षण करुन त्यांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर महापालिका आणि जिल्हा परिषदांना सतर्क राहण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येईलच असे नाही: टोपे
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, असं विधान राजेश टोपे यांनी केल्याच्या बातम्या सर्वच माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना राजेश टोपे यांनी ही सारवासारव केली होती. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता मी व्यक्त केली होती. ती येईलच असे नाही. पण दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी कोरोना लसीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोना लसीबाबतची पूर्ण तयारी झाली आहे. फ्रंटलाइन वर्कर्सची यादी तयार झाली आहे. कोल्ड स्टोरेज व्यवस्था पूर्ण होत आली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज होत आहे, असंही ते म्हणाले. जानेवारी फेब्रुवारीपर्यंत लस आलीच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्राला लस कधी उपलब्ध होणार याबाबत आम्ही देशाच्या आरोग्यमंत्र्यांकडून माहिती मागवली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, आरोग्य विभागाकडून भीती व्यक्त
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येईलच असे नाही: राजेश टोपे
uddhav thackeray ! …तर कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते; मुख्यमंत्र्यांचा सतर्कतेचा इशारा
The possibility of another wave of corona, a review of preparations by Aditya Thackeray