ISI ला मोदीच पाहून घेतील, ट्रम्प यांचं इम्रान खानच्या प्रश्नावर उत्तर
याबाबतचा एक प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला. पण 'ते' मोदीच पाहून घेतील, असं मिश्कील उत्तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं. द्विपक्षीय चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेत बोलत होते.
न्यूयॉर्क : पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने अलकायदाच्या (ISI trained al qaeda) दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं असं खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीच कबूल केलं. या प्रश्नाकडे (ISI trained al qaeda) तुम्ही कसं पाहता? असा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला. पण ‘ते’ मोदीच पाहून घेतील, असं मिश्कील उत्तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं. द्विपक्षीय चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेत बोलत होते.
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून नेहमीच भारतात दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न होतो. जगभरात भ्याड हल्ले करणाऱ्या अलकायदाच्या दहशतवाद्यांनाही आयएसआयनेच प्रशिक्षण दिलं होतं अशी कबुली इम्रान खानने दिली. हे वक्तव्य आपण ऐकलं असून याकडे मोदीच पाहतील, असं स्पष्टीकरण डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं.
#WATCH New York: US President Donald Trump says, "…The Prime Minister (PM Modi) will take care of it" when asked 'how do you see the statement coming from Pakistani PM admitting that the Pakistani ISI trained Al Qaeda?' pic.twitter.com/xex80Hg5aH
— ANI (@ANI) September 24, 2019
पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात जाहीर व्यासपीठावरुन त्यांची भूमिका मांडली. दोन्ही देश मिळून काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात. आम्ही मिळून कट्टरपंथी मुस्लीम दहशतवाद संपवू. मोदी रॉकस्टार एलविस प्रेस्लीप्रमाणे लोकप्रिय आहेत. मला ते आवडतात, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प हे माझ्यासोबतच भारतीयांचे चांगले मित्र असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉस्टनमधील कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल मोदींनी आभारही मानले.