अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात उपोषणाला सुरुवात केली आहे. अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धीचे गावकरीही धरणे आंदोलन करणार आहेत. अण्णा हजारे यांना समर्थन देण्यासाठी राळेगणसिद्धीत गावकऱ्यांनी कँडल मार्च […]

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात उपोषणाला सुरुवात केली आहे. अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धीचे गावकरीही धरणे आंदोलन करणार आहेत. अण्णा हजारे यांना समर्थन देण्यासाठी राळेगणसिद्धीत गावकऱ्यांनी कँडल मार्च काढला. सरकारनं अण्णांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास उद्यापासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

वाचा: सत्ताधारी असो किंवा विरोधक, लोकपालला सगळेच का घाबरतात?

दरम्यान, आम्ही अण्णा हजारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण अण्णा चर्चेला तयार नव्हते. आम्ही अण्णा हजारे यांच्या 80% मागण्या मान्य केल्या आहेत. अण्णा यांनी वय आणि प्रकृती लक्षात घेता हे उपोषण करु नये, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री अण्णा हजारे यांच्यासोबत बोलले होते. पुन्हा मी दोन दिवसांनी अण्णा हजारे यांना भेटायला जाणार आहे. या विषयावर 2 दिवसांत तोडगा निघेल, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. तर अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, असं आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.

डबेवाल्यांचा पाठिंबा दरम्यान, मुंबईच्या डबेवाल्यांनी अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. लोकपाल नियुक्ती केली जावी म्हणून राळेगणसिध्दी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसले आहे. या लढ्यात आम्ही अण्णा हजारे यांच्यासोबत आहोत, असं मुंबई डबेवाला असोशिएशनने म्हटलं आहे. लवकरच डबेवाले असोशिएशनचे शिष्टमंडळ राळेगणसिध्दी येथे जाऊन अण्णा हजारेंची भेट घेणार आहे.

अण्णा काल काय म्हणाले?

या देशात स्वतंत्र कोणाला मिळालं, भ्रष्टाचार थांबला नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार काय करतंय? असा सवाल अण्णांनी विचारला. निवडून येण्यापूर्वी सरकारने आश्वासन दिले होते, मात्र आता काय झालं? 2006 ला स्वामिनाथन आयोग स्वीकारला मात्र अजून लागू केला नाही. मोदी सरकारने आश्वासन दिले होते मात्र पूर्ण केलं नाही. आधीच्या सरकारने लोकपाल आणि लोकयुक्त कायदा संसदेत आणला, 17 डिसेंबरला कायदा पास झालe, नंतर अंबालबजावणी करायची तर नरेंद्र मोदी बहानेबाजी करत आहेत, असा आरोप अण्णांनी केला.

या सरकारची इच्छा नाही. भ्रष्टाचारमुक्त भारत व्हावा असे यांना वाटत नाही. लोकायुक्त कायदा आला तर पंतप्रधानांची चौकशी होईल. चार वर्षे झाले या सरकारला, मात्र अजून कायदा करायला तयार नाही, असं अण्णा म्हणाले.

अण्णांची मागणी काय आहे?

केंद्रात लोकपाल नियुक्तीसाठी अण्णा हजारे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आणि अण्णांनी त्यांचं गाव राळेगणसिद्धीतून या उपोषणाला बुधवारी 30 जानेवारीपासून सुरुवात केली. अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनानंतर 2013 साली तत्कालीन यूपीए सरकारने लोकपाल कायदा मंजूर केला. पण त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही. केंद्र सरकारकडून लोकपालच्या नियुक्तीसाठी पॅनलची नियुक्ती करण्यात आली आहे. या पॅनलकडून लोकपाल कुणाला नियुक्त करायचं त्याबाबत शिफारस करण्यात येईल आणि त्यानंतर पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, सरन्यायाधीश (किंवा सरन्यायाधीशांनी नियुक्त केलेले न्यायमूर्ती) आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेता यांच्या उच्चस्तरीय समितीकडून लोकपालची नियुक्ती केली जाईल.

लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात आंदोलन करत आहेत.

संबंधित बातम्या 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं आजपासून उपोषण    

निवडणुकीच्याआधी अण्णा हजारेंचं पुन्हा एकदा जनआंदोलन सत्याग्रह 

आखाडा : अण्णा हजारेंच्या आंदोलनाने लोकपाल लोकायुक्ताची नियुक्ती होईल? 

मुंबई : अण्णा हजारेंच्या फोननंतर गिरीश महाजन हेलिकॉप्टर मधून खाली उतरले  

सत्ताधारी असो किंवा विरोधक, लोकपालला सगळेच का घाबरतात?  

लोकायुक्त आता मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करणार 

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.