मुंबई : पोलिसांनी तीन अशा चोरांना पकडले आहे जे मंदिरातील दान पेटी चोरतात. विशेष म्हणजे ते मंदिरात पहिले पूजा करतात त्यानंतर ते तेथील दानपेटी (Theft in temple cctv) चोरतात. ही घटना दहिसर पूर्व येथील कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुर्तुजा अखतर हुसैन शेख (65), अकीब मुर्तुजा शेख (21) आणि यासीन इशाक खान (21)वर्ष अशी अटक केलेल्या आरोपींची नावं (Theft in temple cctv) आहेत.
या तिन्ही आरोपींनी दहिसर पूर्व येथील फुलपाखरु गार्डनजवळील साई बाबा मंदिर आणि हनुमान मंदिरातील दानपेटी चोरली. हे तिघे नालासोपारावरुन ऑटो रिक्षाने दहिसरपर्यंत ऑटो रिक्षाने यायचे त्यानंतर दुसऱ्यांची रिक्षा चोरायचे. त्यानंतर मंदिरातील दानपेटी चोरुन स्वत:च्या रिक्षाने घरी जायचे.
या तिन्ही चोरट्यांना दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. दहिसर पोलिसांच्या हद्दीतील तीन मंदिरातील दानपेट्या या चोरट्यांनी चोरल्या आहेत. ज्याचा पोलीस शोध घेत होते.
सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये चोर मंदिराच्या बाहेर येतात. घंटी वाजवून आतमध्ये येतात. देवासमोर हात जोडून प्रार्थना करतात. त्यानंतर मंदिराचा दरवाजा उघडून आतमध्ये येतात आणि मंदिराची दानपेटी घेऊन तेथून फरार होतात.
“जो सगळ्यांकडून घेतो आम्ही त्याच्याकडून घेतो तर यामध्ये चुकीचं काय? आम्ही चोरी करण्यापूर्वी देवाकडे हात जोडून माफीही मागतो”, असं अटक केलेल्या चोरांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान, अटक केलेल्या आरोपींमध्ये बाप, मुलगा तसेच त्यांच्या शेजारच्या एका तरुणाचाही समावेश होता. हे तिघेही नालासोपारा येथील रहिवासी आहेत. दाखवण्यासाठी हे लोक ऑटो रिक्षा चालवत होते. पण रात्रीचे मंदिरातून दान पेटी चोरत होते.