Bigg Boss-13 च्या स्पर्धकांची यादी लीक, यंदा कोण बिग बॉसच्या घरात कैद होणार?

यंदाच्या ‘बिग बॉस-13’मध्ये बॉक्सर विजेंदर सिंग, अभिनेत्री महिमा चौधरी आणि फॅशन डिझायनर रितू बेरी या असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Bigg Boss-13 च्या स्पर्धकांची यादी लीक, यंदा कोण बिग बॉसच्या घरात कैद होणार?
Follow us
| Updated on: Jun 09, 2019 | 12:31 PM

मुंबई : टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध रियालिटी शो म्हणजेच ‘बिग बॉस’चं 13 वं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या पर्वात स्पर्धक म्हणून कोण असणार याबाबत अंदाज लावले जात आहेत. यंदाच्या पर्वात बॉक्सर विजेंदर सिंग, अभिनेत्री महिमा चौधरी आणि फॅशन डिझायनर रितू बेरी या असणार आहेत, अशी बातमी होती. त्यावर या कलाकांरांनी स्वत: या केवळ अफवा असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता पुन्हा यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात कोण असणार याबाबत अंदाज बांधण्यास सुरुवात झाली आहे.

‘बिग बॉस 13’च्या स्पर्धकांची संभाव्य यादी

  • अभिनेत्री झरीन खान
  • अभिनेता चंकी पांडे
  • अभिनेता राजपाल यादव
  • अभिनेत्री वरीना हुसैन
  • अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी
  • अभिनेत्री अंकिता लोखंडे
  • अभिनेता राकेश वशिष्ट
  • अभिनेत्री महिका शर्मा
  • पॉर्न स्टार डॅनी डी
  • जीत चिराग पासवान
  • अभिनेता राहुल खंडेलवाल
  • अभिनेता हिमांश कोहली
  • अभिनेत्री मेघना मलिक
  • फॅशन डिझायनर रितु बेरी
  • अभिनेता महाक्षय चकवर्ती
  • अभिनेता दयानंद शेट्टी
  • फॅजी बू
  • अभिनेत्री महिमा चौधरी
  • अभिनेत्री सोनल चौहान
  • बॉक्सर विजेंदर सिंग
  • रॅपर फाजिलपुरिया
  • अभिनेता सिद्धार्थ शुक्ला

हे सर्व ‘बिग बॉस’च्या 13 व्या पर्वात असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यापैकी कुठल्याही नावाबाबत खुलासा करण्यास किंवा बोलण्यास कार्यक्रमाच्या सूत्रांनी नकार दिला आहे.

या शोमध्ये भाग घेण्याची माझी इच्छा नाही, असं बॉक्सर विजेंदर सिंग यांनी सांगितलं. तर अभिनेत्री महिमा चौधरी हिनेही शोमध्ये भाग घेण्याबाबतची माहिती फेटाळली आहे. दुसरीकडे अभिनेत्री जरीन खानने देखील याबाबच्या बातम्यांना अफवा असल्याचं सांगितलं. “माझ्या बाबत एक बातमी वाचून मलाच हसायला आलं. ‘बिग बॉस 13’ मध्ये मी जाणार ही बातमी पूर्णपणे खोटी आहे”, असं ट्वीट झरीन खानने केलं. तसेच फॅशन डिझायनर रितू बेरी यांनीही त्या ‘बिग बॉस 13’ मध्ये स्पर्धक असल्याची बातमी नाकारली आहे.

अंकिता, हिमांश आणि रॅपर फजिलपुरिया यांनीही ही माहिती फेटाळली आहे. महिका आणि देवोलीनाने देखील त्या ‘बिग बॉस 13’ मध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर इंटरनेट सेन्सेशन रीना द्विवेदी या त्यांना कधी निमंत्रण मिळणार याची वाट पाहात आहेत.

‘बिग बॉस 13’चं शूटिंग यंदा लोणावळ्यात नाही, तर गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये होणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाही याचं होस्टींग अभिनेता सलमान खान करेल. यावेळी 100 दिवसांसाठी स्पर्धकांवर मल्टीडायमेन्शनल कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.