1 फूट रुंद, 2 फूट लांबीची पोस्ट ऑफिसची भिंत फोडून चोराच्या हाती केवळ 487 रुपये
राजधानी दिल्लीच्या एका पोस्ट ऑफिसमध्ये चोराने चक्क चोरी करण्यासाठी चक्क भिंत (Thief break post office wall delhi) फोडण्याची घटना घडली आहे.
दिल्ली : राजधानी दिल्लीच्या एका पोस्ट ऑफिसमध्ये चोराने चक्क चोरी करण्यासाठी चक्क भिंत (Thief break post office wall delhi) फोडण्याची घटना घडली आहे. चोराने पोस्ट ऑफिसच्या भिंतीला एक फूट रुंद, दोन फूट लांब असा भगदाड पाडला. पण त्याच्या या अथक प्रयत्नानंतरही त्याला यश आले नाही. कारण या पोस्ट ऑफिसमध्ये चोराला केवळ 487 रुपये (Thief break post office wall delhi) मिळाले.
चोराने भिंतीमध्ये जवळपास दोन फूट लांब आणि एक फूट रुंद भगदाड पाडले होते. त्यामुळे चोर हा अंगाने बारीक असावा, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असून अधिक चौकशी सुरु केली आहे, अशी माहिती पोलीस सह आयुक्त शर्मा यांनी दिली.
हे पोस्ट ऑफिस मानसरोवर पार्कच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये आहे. या पोस्ट ऑफिससमोर काही दुकानं आहेत. या घटनेची माहिती सोमवारी (30 डिसेंबर) सकाळी पोस्ट मास्टर कुलदीप सिंह वर्मा यांनी 8.30 वाजता पोस्ट ऑफिस उघडल्यावर समोर आली.
“या छोट्या बोगद्यातून बारीक माणूस जाऊ शकतो. जर चोराला माहित असते की आतमध्ये फक्त 487 रुपये आहेत. तर एवढी मेहनत घेऊन त्याने हे काम केलेच नसते. या ऑफिसमध्ये 5 हजार रुपयांची नाण्यांनी भरलेली गोणी मिळाली. ज्याला चोराने हातही लावलेला नाही”, असं पोलिसांनी सांगितले.