लग्न करताना जाती-धर्माचा विचार करणार नाही, हजारो तरुणांचा निर्धार

राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष पद्मश्री गणेश देवी (Dr Ganesh Devy on Marriage and Caste religion) यांनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त (150th Birth Anniversary of Mahatma Gandhi) भारतातील तरुणांना जोडीदार निवडताना जातीचा वा धर्माचा विचार न करण्याचं आवाहन केलं.

लग्न करताना जाती-धर्माचा विचार करणार नाही, हजारो तरुणांचा निर्धार
Follow us
| Updated on: Oct 12, 2019 | 11:02 AM

पुणे: राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष पद्मश्री गणेश देवी (Dr Ganesh Devy on Marriage and Caste religion) यांनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त (150th Birth Anniversary of Mahatma Gandhi) भारतातील तरुणांना जोडीदार निवडताना जातीचा वा धर्माचा विचार न करण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला महाराष्ट्रातून हजारो तरुणांनी प्रतिसाद दिला आहे. राज्यातील 4500 तरुणांनी लग्नाच्या वेळी जोडीदाराची निवड करताना जाती-धर्माचा विचार करणार नसल्याचा आपला निर्णय गणेश देवींना सांगितला आहे.

गणेश देवींनी तरुणांना 2 ते 10 ऑक्टोबर या काळात आपला निर्णय कळवण्याचं आवाहन केलं होतं. तसेच रोज प्रत्येकी किमान 100 तरुणांचा सकारात्मक प्रतिसाद आला नाही, तर त्या दिवशी उपोषण करण्याची घोषणाही केली होती. यानंतर तरुणांनी या उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. राज्यातील जवळपास 4500 तरुणांनी गणेश देवींना ईमेलद्वारे आपला निर्णय कळवला. या काळात देवी यांनी युवकांना वाचण्यासाठी आणि आपल्या निर्णयाच्या बाजू समजून घेण्यासाठी अनेक विषयांवरील लेखही उपलब्ध करुन दिले. राष्ट्र सेवा दलाच्या पुणे येथील वसतिगृहातील मुलांनी या लेखांचं मागील 9 दिवस सार्वजनिक वाचनही केलं.

तरुणांच्या प्रश्नांना मान्यवरांची उत्तरं

जात-धर्म मुक्त समाजाच्या दिशेने जाण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांवर तरुणांनी चिंतन करावे, यासाठी तरुणांना संबंधित लेख उपलब्ध करुन देण्यात आले. या चर्चांमध्ये विविध मान्यवरांनी तरुणांच्या या चर्चा ऐकल्या आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. या मान्यवरांमध्ये साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, आरोग्य सेनेचे डॉ. अभिजित वैद्य, गांधी स्मारक निधीचे अन्वर राजन, मासूम संस्थेच्या मानिषाताई गुप्ते, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रवी मेढे, वोपाचे प्रफुल्ल शशिकांत आदींनी सहभाग घेतला.

आयुष्यातील जोडीदाराच्या निवडीचे निकष काय?

या 9 दिवसांच्या उपक्रमाचा शेवट वोपा (VOPA) संस्थेचे प्रफुल्ल शशिकांत यांच्या संवाद सत्राने झाला. आयुष्यातील जोडीदाराची निवड कोणत्या निकषांवर करावी यावर यात चर्चा झाली. जात आणि धर्म याऐवजी मूल्य, उद्दिष्टं, भूमिका आणि व्यक्तिमत्त्व यावर आधारीत जोडीदाराची निवड असावी, असं मत प्रफुल्ल शशिकांत यांनी व्यक्त केलं. आपल्या जगण्यात आणि विचार करण्यात भारतीय संविधानातील मूल्यांचा समावेश असावा अशीही भूमिका यावेळी प्रफुल्ल शशिकांत यांनी मांडली.

प्रफुल्ल शशिकांत म्हणाले, “प्रगल्भ प्रेमामध्ये एकमेकांविषयीची काळजी, जबाबदारी, आदर आणि ज्ञान गरजेचं असतं. त्यामुळे गणेश देवींच्या आवाहनाचं महत्व आणि गांभीर्य तरुणांनी लक्षात घ्यावं आणि डोळसपणे या सगळ्या प्रक्रियेकडं पहावं.”

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाराष्ट्र राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष गोपाळ नेवे यांनी केला. साधना शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्र सेवा दलाच्या वसतिगृहातील मुलामुलींनी या कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडली. राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक, सिंहगड रोड, पर्वती पायथा, पुणे येथील मुख्यालयात रोज सायंकाळी ७ वाजता हा उपक्रम संपन्न झाला.

यामागील डॉ. गणेश देवींची भूमिका काय?

आपल्या या आवाहनाविषयी बोलताना डॉ. गणेश देवी म्हणाले, “स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 3 वर्षांनी माझा जन्म झाला. मी तरुण होतो तेव्हा माझ्या पिढीला असं वाटतं होतं की हे जातीचं भान काळानुसार बोथट होत जाईल. जातीजातींमधील द्वेष कमी होईल. आंतरजातीय लग्नं होतील. जातींची एकमेकांत मिसळणं होईल. आपली जात विसरून दुसऱ्या जातीत, दुसऱ्या धर्मातील माणसांशी सहज नातं जोडता येईल. पण आताची परिस्थिती नेमकी याच्या विरूद्ध आहे. लोक त्यांची जात विसरलेले नाहीत. उलट जातीच्या अस्मिता जास्त टोकदार झाल्या आहेत. यात आपलं सरकारही धर्मावरून समाजाची होणारी विभागणी थांबवण्यासाठी काहीही करत नाही. उलट ती वाढवण्याचीच कामं करत आहे.”

हे सगळं फार हिंसक आहे. हे प्रकार उद्विग्न करणारे आहेत. एकविसाव्या शतकातील आधुनिक समाजाची ही लक्षणं नाहीत. ही लक्षणं मध्ययुगीन रानटी समाजाची आहेत. म्हणूनच जाती-धर्म मुक्त समाजाचं स्वप्न साकार करण्यासाठी हे आवाहन केलं, असं देवी यांनी नमूद केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.