कोल्हापूरच्या इचलकरंजीत जीवघेण्या चाकूहल्ल्याचा थरार, जखमीवर सांगलीत उपचार, पोलिसांकडून तिघांना अटक

विनायक हुक्कीरे चाकू हल्ला प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हुक्कीरे यांच्यावर सांगलीतील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ( Three accused arrested by police for knife attack on Vinayak Hukkire)

कोल्हापूरच्या इचलकरंजीत जीवघेण्या चाकूहल्ल्याचा थरार, जखमीवर सांगलीत उपचार, पोलिसांकडून तिघांना अटक
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 4:21 PM

कोल्हापूर- इचलकरंजी-कोल्हापूर रोडवर कबनूर परिसरात असणाऱ्या हॉटेल रविराज येथे विनायक हुक्कीरे या युवकावर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास जीवघेणा चाकूहल्ला झाला होता. या घटनेतील जखमी विनायक हुक्कीरेला सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. ( Three accused arrested by police for knife attack on Vinayak Hukkire)

बसवराज महादेव तेली उर्फ कानापत्रावर, अशोक तमन्ना तेली, सुभाष तमन्ना तेली असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विनायक हुक्कीरे हे भाजपच्या नगरसेविकेचे पती आहेत. विनायकचा जिमचा व्यवसाय आहे. दरम्यान, बसवराज व सद्दाम या दोघांचा आर्थिक वाद होता तो वाद मिटवून बसवराजने सद्दामला द्यावे लागत असणारे पैसे द्यावेत यासाठी विनायकने तगादा लावल्याने बसवराजने चिडून विनायक हुक्कीरे याच्या घरावर आठवड्या भरा पूर्वी हल्ला केल्याची घटना घडली होती.

विनायक हुक्कीरे याने सद्दामचे पैसे बसवराजने द्यावे यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले होते. त्यामुळे बसवराजने मित्रांसोबत जेवायला गेलेल्या विनायक हुक्कीरे यावर रविराज हॉटेल मध्ये जाऊन माझा वाद मिटवणारा तू कोण असे म्हणून विनायकवर चाकू सारख्या धारदार शास्त्राने हल्ला केला. विनायक वार वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. हॉटेलच्या हॉल मधून किचनमध्ये गेला तिथे तो सापडल्याने त्याच्यावर बसवराजने पोटावर, छातीवर, मांडीवर व पाठीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले.

विनायक हुक्कीरेचा बचाव करणारी महिलाही जखमी

जखमी अवस्थेत विनायक हुक्कीरे पळून जाऊन हॉटेल मागे असणाऱ्या उसाच्या शेतात लपला. तिथे असणाऱ्या एका महिलेने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्या महिलेच्या हातावरही वार झाला. यामध्ये तिच्या हाताला जखम झाली आहे. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढल्यानंतर विनायकला हॉटेल मालकाने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथून विनायकला सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले असून तो उपचाराला प्रतिसाद देत आहे.

हॉटेल रविराजमध्ये अचानकपणे घडलेल्या हल्ला झाल्याने जेवणासाठी आलेले नागरिक पळापळ करू लागले हॉटेलमध्ये असणाऱ्या स्टापची तारांबळ उडाली. रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे हे करीत आहेत.

संबंधित बातम्या: 

डोक्यात दगड घालून अल्पवयीन मुलीची हत्या , बाथरूम शेजारी मृतदेह आढळल्याने खळबळ

दाटीवाटीच्या लोकवस्तीत बिस्कीटच्या दुकानाआड फटाक्यांची विक्री, दीड लाखांचे फटाके जप्त

( Three accused arrested by police for knife attack on Vinayak Hukkire)

Non Stop LIVE Update
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.