नेपाळमध्ये भारताच्या तीन नोटा बंद!
नवी दिल्ली : नेपाळने भारतीय चलनाच्या नोटांवर बंदी घातली आहे. नेपाळमध्ये आजपासून 200, 500 आणि 2000 च्या भारताच्या नव्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. नेपाळचे माहिती आणि प्रसारण मंत्री गोकुळ प्रसाद बास्कोटा यांनी गुरुवार रात्री यासंबंधीत माहिती दिली. नेपाळ कॅबिनेटने तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता भारतीय चलनाच्या 200, 500 आणि 2000 च्या नोटा […]
नवी दिल्ली : नेपाळने भारतीय चलनाच्या नोटांवर बंदी घातली आहे. नेपाळमध्ये आजपासून 200, 500 आणि 2000 च्या भारताच्या नव्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. नेपाळचे माहिती आणि प्रसारण मंत्री गोकुळ प्रसाद बास्कोटा यांनी गुरुवार रात्री यासंबंधीत माहिती दिली. नेपाळ कॅबिनेटने तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता भारतीय चलनाच्या 200, 500 आणि 2000 च्या नोटा नेपाळमध्ये आणणे, सोबत बाळगणे तसेच या नोटांचा वापर खरेदी-विक्रीसाठी करणे बेकायदेशीर असेल.
नेपाळी वृत्तपत्र काठमांडू पोस्टनुसार, सरकारने नागरिकांना सूचित केले आहे की यानंतर 100 रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे भारतीय चलन म्हणजेच 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा वापर करणे बेकायदेशीर असेल. यानंतर नेपाळमध्ये 100 आणि त्यापेक्षा कमी किमतीच्या नोटाच मान्य केल्या जातील.
दोन वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदी सरकारने भारतात नोटबंदी केली होती. तेव्हा जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. नेपाळमध्ये भारतीय चलन चालतं. त्यामुळे नोटबंदीनंतर नेपाळच्या बँकांमध्येही मोठ्या प्रमाणात 500 आणि 1000 च्या नोटा पडून होत्या, ज्या भारतात परत आल्या नाहीत. याचा मोठा फटका नेपाळला सहन करावा लागला. अशी समस्या पुन्हा उद्भवू नये याची खबरदारी म्हणून नेपाळ सरकारने हा निर्णय घेतला आहे.
भारताच्या नव्या नोटांना नेपाळ सरकारने आतापर्यंत मान्यता दिलेली नव्हती, मात्र त्यांना बेकायदेशीरही ठरवले नव्हते. त्यामुळे या नोटा आतापर्यंत तेथे चलनात होत्या. मात्र आता नेपाळ सरकारने नव्या भारतीय नोटांना कायदेशीररित्या चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेपाळ सरकारच्या या निर्णयाचा प्रभाव नेपाळ पर्यटनावर होऊ शकतो. दरवर्षी भारतातून मोठ्या संख्येने पर्यटक नेपाळला भेट देतात. मात्र आता भारतीय चलनातील मोठ्या नोटा नेपाळने रद्द केल्याने भारतीय पर्यटकांना व्यवहारात अडचण होणार असल्याने, याचा परिणाम तेथील पर्यटनावर होऊ शकतो.
यानंतर भारतीयांना नेपाळमध्ये जाताना 100 किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या नोटा नेता येतील, नाहीतर 200, 500 किंवा 2000 च्या नोटा नेपाळ सीमेवर नेपाळी चलनाशी बदलाव्या लागतील.
या निर्णयाचा परिणाम नेपाळच्या पर्यटनावर होणार असला, तरी देशाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं नेपाळ सरकारने सांगितले.