पुण्यात ट्रक चालकाने पाच जणांना चिरडलं, तिघांचा मृत्यू

| Updated on: Sep 11, 2019 | 12:10 AM

पुण्यात मद्यपी ट्रक चालकाने (Truck Driver) पाच जणांना चिरडलं आहे. ही घटना आज (10 सप्टेंबर) रात्री 9 च्या दरम्यान मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येते घडली.

पुण्यात ट्रक चालकाने पाच जणांना चिरडलं,  तिघांचा मृत्यू
Follow us on

पुणे : पुण्यात मद्यपी ट्रक चालकाने (Truck Driver) पाच जणांना चिरडलं आहे. ही घटना आज (10 सप्टेंबर) रात्री 9 च्या दरम्यान मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथे घडली. या भीषण अपघातात (Accident) तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोनजण जखमी आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पिरांगुट घाट उतारावर या भरधाव ट्रकने वाहनांना धडक दिली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक चालक (Truck Driver) दारु पिऊन गाडी चालवत असल्याचे समोर आलं आहे. हा चालक अपघात स्थळावरुन पळून जात असताना त्याला पोलिसांनी पकडले आहे.

या घटनेत मृत झालेल्यांची नावं अद्याप समजू शकलेली नसून त्यांना पौड येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं आहे. तर जखमींना पिरांगुट येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघातामुळे पिरंगुट मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.