भारतीय वायू सेनेची ताकद अजून वाढणार!, आज ३ ‘राफेल’ विमान भारतात दाखल होणार

फ्रान्स आणि भारतात एकूण 36 राफेल विमानांचा करार झाला आहे. यातील 5 राफेल विमानं 29 जुलैला अंबाला एअरबेसवर दाखल झाली आहेत. तर आज 3 राफेल विमान भारतीय वायू दलात दाखल होणार आहेत.

भारतीय वायू सेनेची ताकद अजून वाढणार!, आज ३ 'राफेल' विमान भारतात दाखल होणार
राफेल विमानांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 8:37 AM

नवी दिल्ली: सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलाची ताकद अजून वाढणार आहे. आज 3 राफेल विमान भारतीय वायू दलात दाखल होणार आहेत. हे 3 राफेल विमान भारतात दाखल होताना रस्त्यात कुठेच इंधन भरणार नाहीत, अशी माहिती भारतीय वायू दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही विमानं भारतात दाखल झाल्यानंतर जामनगरमध्ये एक दिवस मुक्काम करतील. त्यानंतर ती अंबाला एअरबेसवर पोहोचतील. महिनाभरापूर्वी भारतीय वायूसेनेची एक टीम फ्रान्समध्ये या विमानांची समिक्षा करण्यासाठी फ्रान्सला गेली होती. (3 Rafale aircraft from France will arrive in India today)

फ्रान्स आणि भारतात एकूण 36 राफेल विमानांचा करार झाला आहे. यातील 5 राफेल विमानं 29 जुलैला अंबाला एअरबेसवर दाखल झाली आहेत. त्यानंतर 10 सप्टेंबरला त्यासंबंधी औपचारिक कार्यक्रम घेण्यात आला. फ्रान्सने भारताला दर 2 महिन्यात 3 ते 4 राफेल विमान देण्याचा शब्द दिला आहे. त्यानुसार 36 राफेल विमान भारतीय वायूसेनेची ताकद वाढवणार आहेत.

सध्या चीन आणि पाकिस्तानकडून भारतीय सीमांवर कुरघोडी सुरुच आहे. लडाख सीमेवरील चीनच्या घुसखोरीचे सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राफेल भारतात दाखल होत असल्यानं भारतीय वायू दलाची ताकद अधिक वाढणार आहे.

लडाख सीमेवर राफेल तैनात

यापूर्वी जून 1997 मध्ये भारताने रशियाकडून 30 सुखोई विमानं खरेदी केली होती. त्यानं जवळपास 23 वर्षांनी भारताने फ्रान्सकडून राफेलसारख्या अत्यंत शक्तिशाली लढाऊ विमानांची खरेदी केली आहे. भारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूसेनेने लडाख सीमेवर राफेल तैनात केले आहेत.

राफेल विमानाची वैशिष्ट्ये

  • राफेल हे 2 इंजिन असलेलं अनेक कामं करू शकणारं मध्यम आकाराचं लढाऊ विमान
  • लांब असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याच्या दृष्टीनं राफेलची निर्मिती
  • हवेतून मारा करणं, हवेतल्या हवेत इंधन भरणं, अण्वस्त्राचा हल्ला झाल्यावर संरक्षण, लक्ष्याच्या हालचाली टिपणं त्यांच्यावर अचूक मारा करण्याची क्षमता
  • हवेत 150 किलोमीटरपर्यंत तर हवेतून जमिनीवर 300 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची अण्वस्त्रसज्ज राफेलची क्षमता

संबंधित बातम्या:

Indian Air Force Day 2020 | भारताच्या ‘हवाई’ शक्तीचं प्रदर्शन, राफेलसह लढाऊ विमानांचा आकाशात थरार!

चोराच्या मनात चांदणं, राफेल भारतात दाखल होताच लाखो पाकिस्तान्यांची गूगलवर माहिती सर्च, पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवरही राफेलचीच चर्चा

3 Rafale aircraft from France will arrive in India today

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.