Nagpur Rain : नागपूरमध्ये वीज कोसळून तीन महिलांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात वीज कोसळून तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे (Women death due to Electricity fall).

Nagpur Rain : नागपूरमध्ये वीज कोसळून तीन महिलांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 8:08 AM

नागपूर : नागपूर जिल्ह्यात वीज कोसळून तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे (Women death due to Electricity fall). तसेच वीज कोसळल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना नागपूरमधील कोंढाळी शिवा परिसरातील घडली. अर्चना तातोडे, शारदा उईके, संगीता मुंगभाते असं मृत झालेल्या महिलांची नावं आहेत (Women death due to Electricity fall).

विज कोसळून जखमी झालेल्या महिलांवर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळल्याने ही घटना घडली. या घटनेमुळे गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली. 10 ऑक्टोबरपासून राज्यात अनेक ठिकाणी विजांसह मुसळधार पाऊस झाल्याने 16 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आधीच कोरड्या जागी ठेवावा तर नागरिकांनीही विनाकारण बाहेर पडू नये, असं हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी सांगितले होते.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेशासह मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आंध्र प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडुसह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य मॉन्सूनची चाहूल लागली असून आसाम, मेघालय परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.

संबंधित बातम्या : 

Special Report | 16 जिल्ह्यांना अलर्ट, जोरदार पाऊस बसरणार!

मुंबईसह 16 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.