रोहिणी खडसे यांच्या वाहनावर दगडफेक; पोलिसांकडून तपास सुरू
रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलीस चौकशीला सुरुवात झाली आहे.
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हा वाद अजून संपलेला नाही तोच आता रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात वाहनाची किरकोळ तोडफोड झाली असून रोहिणी खडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान या घटनेच्या तपासाला सुरुवात केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यातRohini Khadse, Ekhnath Khadse, BJP, NCP, Chandrakant Patil, stone throwing, Jalgaon आली आहे.
Latest Videos