बिहारमध्ये वीज कोसळून तब्बल 83 जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशातही अनेकांनी प्राण गमावले
बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज पडून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे (Thunderstorms Lightening in Bihar 83 people died).
पटना : बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज पडून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे (Thunderstorms Lightening in Bihar 83 people died). बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. बिहारमध्ये मागील अनेक तासांपासून मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाने पुढील 2-3 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील अनेकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
बिहारमधील या नैसर्गिक संकटात गेलेल्या बळींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याप्रकरणी दु:ख व्यक्त केलं आहे. या दुर्घेटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदतीची घोषणा त्यांनी केली आहे. सध्या राज्यातील वातावरण खराब असल्याने कुणीही घरातून निघू नये, असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
#UPDATE 83 people have died due to thunderstorms in Bihar today; maximum 13 people lost their lives in Gopalganj district: State Disaster Management Department https://t.co/cHOmutIr0l
— ANI (@ANI) June 25, 2020
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करत 83 जणांच्या मृत्यूच्या या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, ”बिहारमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वीज पडल्याने आज 83 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मी अत्यंत दुःखी आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करतो. देव त्या सर्वांच्या आत्म्याला शांती देवो. मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत तात्काळ पोहचवावी.”
बिहार के विभिन्न जिलों में वज्रपात के कारण हुई आज 83 लोगों की असामयिक मौत से मर्माहत हूँ। मृतकों के परिजनों के प्रति गहरी शोक-संवेदना व्यक्त करता हूँ।भगवान सबों की आत्मा को शांति प्रदान करे।
सरकार से अपील है कि पीड़ित परिवारों व आश्रितों तक उपयुक्त अनुग्रह राशि यथाशीघ्र पहुँचाए।
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) June 25, 2020
या घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केलं आहे. “बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड पाऊस आणि वीज पडल्याने अनेक नागरिकांचं निधन झालं आहे. राज्य सरकारकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घचनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबायांप्रती मी संवेदना व्यक्त करतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
बिहार और उत्तर प्रदेश के कुछ जिलों में भारी बारिश और आकाशीय बिजली गिरने से कई लोगों के निधन का दुखद समाचार मिला। राज्य सरकारें तत्परता के साथ राहत कार्यों में जुटी हैं। इस आपदा में जिन लोगों को अपनी जान गंवानी पड़ी है, उनके परिजनों के प्रति मैं अपनी संवेदना प्रकट करता हूं।
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2020
हेही वाचा :
दिल्लीच्या हॉटेलात आता चिनी नागरिकांना नो एण्ट्री, हॉटेल असोसिएशनची घोषणा
CBSE ICSE Board Exams | सीबीएसई-आयसीएसई दहावी बारावीच्या परीक्षा रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
West Bengal Lockdown : | पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला
Thunderstorms Lightening in Bihar 83 people died