यवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण

शेतात निंदन करत असताना अचानक वाघाने हल्ला केला (Tiger attack on woman in Yavatmal).

यवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण
Follow us
| Updated on: Sep 19, 2020 | 6:03 PM

यवतमाळ : शेतात निंदन करत असताना अचानक वाघाने हल्ला केला (Tiger attack on woman in Yavatmal). या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील अंधारवाडी गावा शेजारी असललेल्या शेतात घडली. लक्ष्मी दडांजे (55) असं मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे पांढरकवडा वन विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या पाटणबोरी बिटमधील अंधारवाडी आणि शेजारच्या गावात वाघाची दहशत निर्माण झाली आहे (Tiger attack on woman in Yavatmal).

मृत लक्ष्मीबाई दंडाजे ही आज (19 सप्टेंबर) आपल्या शेतात निंदन करत होती. यावेळी अचानक वाघाने तिच्यावर पाठीमागून हल्ला केला. हल्ला केल्यानंतर तिने आरडाओरडा केल्याने शेतातील मजूर तिच्या मदतीसाठी धावून आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी संगीता कोंकणे आणि इतर कर्माचारी उपस्थित झाले.

मृतदेह पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. यावेळी प्रभारी उप वनसंरभक सुभाष धुमारे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते.

पांढरकवडा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या पाटणबोरी सर्कलमधील बोरी बीटमध्ये असलेल्या अंधारवाडी या परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा वावर सुरू आहे. आतापर्यंत या परिसरातील पाळीव गाय, बैल, बकरी अश्या आठ ते दहा जनावरांची शिकार केली आहे.

दरम्यान, वाघाला जेरबंद करण्यासाठी काहीदिवसांपूर्वी वनविभागाची वाहने आली होती. पण गावकऱ्यांनी वनविभागाची वाहनं अडविले होती. तर 15 दिवसांपूर्वी वाघाने एका शेतकऱ्यांवर हल्ला चढविला होता. मात्र, शेतकरी झाडावर चढल्याने त्याचा जीव वाचला. याची दखल घेऊन वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी 20 जणांची रेस्क्यू टीम तयार करण्याचे आदेश दिले होते.

संबंधित बातम्या :

VIRAL VIDEO : भंडाऱ्यात वाघाचा तरुणावर हल्ला, बचावासाठी तरुणाकडून अनोखी शक्कल

आईसोबत फिरायला गेलेल्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला, CISF जवानाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.