Tik Tok वर 5 लाख फॉलोअर्स, तरुणाची गोळ्या झाडून हत्या
नवी दिल्ली : सध्या मोबाईलप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेलं अॅप म्हणजे टिक टॉक. या टिक टॉक अॅपमुळे अनेकांचे जीव गेले आहेत. दिल्लीत एक अशीच थरारक घटना घडली. TikTok अॅपवर तब्बल 5 लाख फॉलोअर्स असलेल्या एका तरुणाची गोळी मारुन हत्या करण्यात आली. मोहित असं या तरुणाचं नाव आहे. दिल्लीतील नजफगढ परिसरात ही घटना घडली. मोहित हा सोशल […]
नवी दिल्ली : सध्या मोबाईलप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेलं अॅप म्हणजे टिक टॉक. या टिक टॉक अॅपमुळे अनेकांचे जीव गेले आहेत. दिल्लीत एक अशीच थरारक घटना घडली. TikTok अॅपवर तब्बल 5 लाख फॉलोअर्स असलेल्या एका तरुणाची गोळी मारुन हत्या करण्यात आली. मोहित असं या तरुणाचं नाव आहे. दिल्लीतील नजफगढ परिसरात ही घटना घडली. मोहित हा सोशल मीडियावरील चर्चित चेहरा होता. त्याचे इन्स्टाग्रामवरही 3 हजार फॉलोअर्स होते.
मोहित एका फोटो स्टुडिओत गेला होता. त्यावेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
तीन दिवसांपूर्वी द्वारका परिसरात दोन टोळ्यांमध्ये अचानक वादावादी झाली होती. त्यावेळीही गोळीबार झाला होता. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र या टोळक्याने पोलिसांवरही गोळीबार केला होता. या चकमकीत पोलिसांनी एका गुंडाला ठार केलं होतं.
या सर्व थरारानंतर दिल्लीत पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेत एकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या
हत्यार घेऊन TikTok व्हिडीओ काढण्याचा आगाऊपणा, पुण्यात तरुणावर गुन्हा
भायssss दुआ में याद रखना, औरंगाबादेत भाई गॅंगच्या गुंडांचा TikTok व्हिडीओ
VIDEO : नागपुरात कुख्यात गुंडाचा पोलीस व्हॅनमध्येच TikTok व्हिडीओ