Corona : कोरोना रोखण्यासाठी TikTok ची 100 कोटींची मदत, वैद्यकीय उपकरणं पुरवणार
प्रसिद्ध व्हिडीओ अॅप्लिकेशन TikTok ने भारताला कोरोनाशी लढण्याकरीता मदत केली आहे. TikTok ने भारताला 100 कोटींची वैद्यकीय उपकरणं दान केली आहेत.
मुंबई : प्रसिद्ध व्हिडीओ अॅप्लिकेशन TikTok ने भारताला (TikTok Help India) कोरोनाशी लढण्याकरीता मदत केली आहे. TikTok ने भारताला 100 कोटींची वैद्यकीय उपकरणं दान केली आहेत. यामध्ये डॉक्टर आणि फ्रंट लाईन मेडिकल स्टाफच्या (TikTok Help India) सुरक्षेसाठी मेडिकल प्रोटेक्टिव्ह सुट (Medical Protective Suite) आणि मास्कचा समावेश आहे.
In the fight against the spread of COVID-19, we are extending support by donating Rs. 100 Crore towards 400,000 hazmat medical protective suits and 200,000 masks to doctors and supporting medical staff. #TikTokForGoodhttps://t.co/H8WeeFl3ei pic.twitter.com/3P7xnPdqXq
— TikTok India (@TikTok_IN) April 1, 2020
TikTok ने वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात, भारतात पसरत असलेल्या कोरोना विषाणूच्या (Corona Virus) लढाईत ते काही मदत करु शकत आहेत, याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
We are humbled to side with the initiative of the government and shall always aim to offer all the support that we can, for the benefit of the community. In the face of crisis, we are proud to stand together to #StopCoronaVirus #IndiaFightsCorona https://t.co/0JBotNSA7p
— TikTok India (@TikTok_IN) April 1, 2020
“20,675 PPE (Personal Protective Equipment) सुटचा पहिला माल भारतात पोहोचला आहे. डॉक्टर आणि इतर स्टाफ वापरत असलेल्या PPE सुटची दुसरी फेरी 4 एप्रिलला भारतात येईल. यामध्ये 1 लाख 80 हजार 375 सुट असतील. इतर 2 लाख PPE सुट येत्या काही आठवड्यांमध्ये भारतात पोहोचेल” (TikTok Help India) , अशी माहिती स्मृती इराणी यांना लिहिलेल्या पत्रात TikTok ने दिली आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवर TikTok चे आभार व्यक्त केले. कोरोना विरुद्धच्या लढाईत TikTok ची मदत कौतुकास्पद आहे. तसेच, PPE सुट हे जागतिक आरोग्य संस्था आणि भारत सरकार आरोग्य मंत्रालयाच्या स्टॅण्डर्डचा आहे, असंही त्यांनी सांगतिलं. तसेच, TikTok चे सीईओ आणि त्यांची टीम गेल्या 10 दिवसांपासून आरोग्य मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या संपर्कात आहे, असंही स्मृती इराणी यांनी सांगितलं.
Citizens from across the country have joined hands with the Government for the #IndiaFightsCorona cause.
I thank @Gandhi1900 & @TikTok_IN for putting #IndiaFirst & donating 4,00,000 Hazmat Suits which fulfil specifications & strict criteria set by @MoHFW_INDIA. pic.twitter.com/gCf9PeJZiV
— Smriti Z Irani (@smritiirani) April 1, 2020
चीनी अॅप्लिकेशन TikTok एक प्रसिद्ध व्हिडीओ अॅप आहे. एकट्या भारतात TikTok चे 25 कोटीपेक्षा जास्त युझर्स आहेत.
TikTok नेहमी भारत सरकारच्या निर्णयांमध्ये सहभागी असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊनच्या निर्णयालाही TikTok ने पाठिंबा दिला. #घर बैठो इंडिया कॅम्पेनही चालवली, अशी माहिती TikTok चे कंट्री प्रमुख निखिल गांधी (TikTok Help India) यांनी दिली.