TikTok की Facebook? 2020 मध्ये सर्वाधिक डाऊनलोड केलेलं अ‍ॅप कोणतं?

लॉकडाऊनच्या कालावधीत लोकांचे मोबाईल आणि सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण अधिकच वाढले. अशातच 2020 मध्ये सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅप्सबाबतचा एक रिपोर्ट समोर आला आहे.

TikTok की Facebook? 2020 मध्ये सर्वाधिक डाऊनलोड केलेलं अ‍ॅप कोणतं?
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 7:40 PM

मुंबई : सोशल मीडिया अ‍ॅप्समध्ये सातत्याने चढाओढ पाहायला मिळते. अधिकाधिक युजर्स मिळवण्यासाठी, युजर्सना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडिया कंपन्या त्यांचं अ‍ॅप सातत्याने अपडेट करत असतात. तसेच युजर्सना आकर्षित करण्यासाठी नवनवीन आणि उपयुक्त फिचर्स देत असतात. जगभरात आता स्मार्टफोन्सचा वापर वाढला आहे. त्यामुळे अ‍ॅप्सचाही अधिकाधिक वापर होवू लागला आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील बहुतांश देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या कालावधीत लोकांचे मोबाईल आणि सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण अधिकच वाढले. अशातच 2020 मध्ये सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅप्सबाबतचा एक रिपोर्ट समोर आला आहे. (App Annie’s report on 2020’s Most Downloaded App)

अ‍ॅनालिटिकल फर्म अ‍ॅप Annie ने सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या अ‍ॅप्सबाबातचा एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार 2020 मध्ये सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅप्सच्या बाबतीत टिकटॉकने (TikTok) फेसबुकला (Facebook) मात दिली आहे. Annie ने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये टॉप 5 अ‍ॅप्सची माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार 2020 सर्वाधिक डाऊनलोड्सच्या बाबतीत टिकटॉक पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्यापाठोपाठ अनुक्रमे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), झुम (Zoom) आणि इंस्टाग्राम (Instagram) या अ‍ॅप्सचा नंबर लागतो. (TikTok Overtakes Facebook to Become 2020’s Most Downloaded App Globally : App Annie report)

App Annie ने त्यांचा वार्षिक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये कोरोना माहामारीचा काळ (लॉकडाऊन कालावधी) हायलाईट करण्याचा प्रयत्न केला आहे. या रिपोर्टनुसार सोशल मीडियासह लोकांनी बिझनेस अ‍ॅप्सवर मोठ्या प्रमाणात वेळ घालवला. यामध्ये तब्बल 200 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच कॉन्फरंस्निंग टूल झुम अ‍ॅपचाही मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. लॉकडॉऊन काळात जगभरातील बहुतांश कंपन्यांना कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली होती. त्यामुळेच लोकांनी या काळात झुम अ‍ॅपसारख्या कॉन्फरन्स अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला, आणि अजूनही करत आहेत.

रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जे लोक प्रामुख्याने मनोरंजनासाठी मोबाईल अधिक प्रमाणात वापरतात त्यांनी टिकटॉकला पसंती दर्शवली आहे. वेळ घालवण्यासाठी लोकांनी टिकटॉकचा सर्वाधिक वापर केला. यासोबतच लोकांनी फेसबुक, फेसबुक मेसेंजर, गुगल मीट, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामसारख्या अ‍ॅप्सचाही मोठ्या प्रमाणात वापर केला आहे.

या महिन्यातील सर्वाधिक सक्रीय युजर्सचा विचार केला तर त्यामध्ये फेसबुक सर्वात वर आहे. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्रामचा नंबर लागतो. iOS आणि गुगल प्ले स्टोरचा वापर करणाऱ्यांमध्ये 25 टक्क्यांची वृद्धी जाणवली आहे. टिकटॉक आणि सोशल मीडिया अ‍ॅप्ससह लोकांनी टिंडरचाही (Tinder) या वर्षात मोठ्या प्रमाणात वापर केला. तर गेम्सच्या बाबतीत पबजी, सबवे सर्फर आणि लुडो किंगसारख्या गेम्सना युजर्सकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली.

इतर बातम्या 

एकाच वेळी 46 राज्यांचा फेसबुकविरोधात खटला, केस हरल्यास Instagram आणि Whatsapp विकावं लागेल

स्टेटस पाहिलंय की नाही हे समोरच्याला समजणार नाही; WhatsApp ची भन्नाट ट्रिक

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती

WhatsApp मध्ये सिक्रेट चॅट करणं सोपं होणार; लवकरच येणार ‘हे’ कमालीचं फिचर

Whatsapp पेमेंट्सचा वापर करणार आहात? त्याआधी ‘या’ सहा गोष्टी लक्षात ठेवा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.