मुंबई : राग कोणत्याही प्रकृतीसाठी हानिकारकच ठरतो. राग कोणत्याही गोष्टीचे उत्तर असूच शकत नाही, ही गोष्ट खरीच आहे, राग म्हणजेच व्देष ही एक सामान्य व प्राकृतिक भावना आहे जी मानवास येणाऱ्या सर्व प्रमुख भावनांपैकी एक मानली जाते. राग ही एक शारीरिक प्रक्रिया आहे.( Tips For Anger Control)
परंतु, कोणाकोणाचा राग इतका वाढतो की, त्याचा परिणाम त्याच्या स्वतःच्या व इतरांच्या जीवनावर पडू लागतो. काही लोक त्यांना कधी राग येतो, हे मान्यच करत नाहीत आणि त्यांना जेव्हां राग येतो तो नियंत्रणाबाहेर होऊन जातो. अशातच ते आपल्या जवळच्या लोकांना नुकसान पोहोचवतात. आपल्यामधील काहीच लोक मान्य करतात की, त्यांचा स्वभाव रागीट आहे.
जीवनात प्रत्येक क्षण समान नसतो. कधी आनंद तर, कधी दुःख सुध्दा येतात. मनुष्य प्रकृतीला राग येणे स्वाभाविक आहे. मात्र, बऱ्याचदा आपल्याला राग आल्याचे कळतच नाही.(Tips For Anger Control)
रागाची लक्षणे : धैर्याचा बांध तुटणे, चिडचिडेपणा, अस्वस्थता वाढणे, शंका व संशयी भाव वाढणे, प्रत्येक कारणास दुसऱ्यांना दोषी ठरवणे, एखाद्याचा अपमान करणे, संबंधित व्यक्तीस कमी लेखणे, वर्तमानात सभोवतालचे भान नसणे.
ही राग येण्याची सामान्य लक्षणे आहेत. याशिवाय परिस्थितीनुरूप अनेक कारणांनी राग वाढू शकतो, आपला परिवार, मित्रसंघ, कार्यक्षेत्र आणि आपल्या जवळच्या लोकांमुळे काही विशेष कारणास्तव रागाची निर्मीती होऊ शकते. रागाच्या उत्पत्तीचे मुळ हे स्वभावात म्हणजेच आपल्या मानसिक तारतम्यांवर अवलंबून असते.(Tips For Anger Control)
जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग येत असेल, तर त्याच्याशी बोलणे टाळा. त्याच्याशी नजर मिळवू नका व मनात 10पर्यंत किंवा पुढेही अंकांची गणना सुरू ठेवा. आपले मन पूर्णपणे अंकांच्या उच्चारात केंद्रीत करा. यामुळे तुमचा राग तर शांत होईलच. पण, त्या बरोबर विचार करण्यास वेळ मिळेल.
जर तुम्हाला अशांत करणारा जोरदार राग येत असेल, तर ज्याच्याशी तुम्ही वाद घालता आहात त्यापासून दूर जा आणि शांत बसून आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा दिसून येईल. समोरचा व्यक्ती शांत झाला असेल तर त्याच्याशी चर्चा करा किंवा तसे वाटत नसेल तर चर्चाही न करता त्याच्याशी बोलणे व संपर्क करणे टाळा.(Tips For Anger Control)
प्राणायाम व पहाटेचा व्यायाम तसेच पहाटेचे चालणे सुध्दा तुमचा मुड दिवसभरासाठी चांगला करू शकतो. प्राणायाममुळे मन केंद्रीत करण्याचा सराव होतो. तसेच श्वास केंद्रित करण्याचा सराव होतो. त्यामुळे राग कमी होण्यास मदत होते. पोहणे, हास्य व्यायाम व चर्चांमुळे तुमचा कमी होऊ शकतो.
कधी कधी कामाची दगदग आणि दगदगीच्या दिनचर्येमुळे मन चिडचिडे होते. त्यामुळे राग लवकर फार लवकर येऊ शकतो. त्यामुळे राग घालविण्यासाठी आपल्या मेंदू शांत असणे फार जरूरी आहे. त्याकरता निवांत झोप घेणे फार जरूरी आहे. निवांत झोपेमुळे तुमची मनस्थिती चांगली होते व त्यामुळे व्यक्ती मानसिक दृष्टया तयार सक्षम होतो. किमान 7 ते 8 तासांची झोप मानवी शरीरासाठी आवश्यक असते.
(Tips For Anger Control)
PHOTO | काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्ती सफारीला आजपासून सुरुवात https://t.co/6mNAtMR0yZ @kaziranga_ @PMOIndia #elephant #ElephantSafari
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 1, 2020