बिहारच्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन: तेजस्वी यादव
नोकऱ्या नसल्यामुळे लोक पैसा खर्च करत नाहीत. लोकांची क्रयशक्ती कमी पडत असल्यामुळेच बिहार राज्य मागास राहिल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले. | Tejashwi Yadav
पाटणा: बिहारच्या तरुणांना 10 लाख नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडल्यास मी मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन. पण तरुणांना नोकऱ्या नक्की देईन, असे आश्वासन राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी दिले. महाआघाडीच्या जाहीरनाम्यात 10 लाख नोकऱ्यांचे आश्वासन देण्यात आले होते. तेव्हापासून राष्ट्रीय जनता आघाडीचे (NDA) नेते तेजस्वी यादव यांच्या या दाव्याविषयी प्रश्न उपस्थित करत होते. तेजस्वी यादव एवढ्या नोकऱ्या कशा देणार? त्यासाठी पैसा कुठून आणणार?, असे प्रश्न ‘एनडीए’च्या नेत्यांकडून विचारले जात होते. (Tejashwi Yadav I will cut CM and ministers salaries to give jobs to 10 Lakh peoples in Bihar)
या सर्व प्रश्नांना तेजस्वी यादव यांनी सोमवारी ‘युवा नोकरी संवाद’ या कार्यक्रमात उत्तर दिले. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातील 80 हजार कोटी पूर्णपणे खर्च होत नाहीत. यानंतरही 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी पैसे कमी पडलेच तर मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांच्या पगारात कपात केली जाईल. बिहारमध्ये बेरोजगारीची टक्केवारी 46.68 टक्के इतकी आहे. त्यामुळे लोक पैसा खर्च करत नाहीत. लोकांची क्रयशक्ती कमी पडत असल्यामुळेच बिहार राज्य मागास राहिल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले.
याशिवाय, तेजस्वी यादव यांनी कमाई, शिक्षण आणि औषधे या त्रिसूत्रीवर भर दिला आहे. या सर्व सोयी राज्यात उपलब्ध करून दिल्या जातील. परराज्यात काम करणाऱ्या 40 लाख मजुरांसाठी प्रत्येक राज्यात कर्पुरी श्रम केंद्रांची स्थापना केली जाईल. तसेच उद्योगधंद्याशी संबंधित लोकांच्या सुरक्षेसाठी बिहारमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था निर्माण केली जाईल, असेही तेजस्वी यादव यांनी सांगितले.
To give jobs to 10 lakh people, even if the salaries of the chief minister, ministers and MLAs need to be cut, then it will be done and jobs will be given: RJD leader Tejashwi Yadav#BiharElections pic.twitter.com/O6sH3PfN79
— ANI (@ANI) November 2, 2020
लोकांना नितीश कुमार नको, बिहारचे पुढचे मुख्यमंत्री तेजस्वी यादवच : संजय निरुपम बिहारमध्ये 8 ते 10 जिल्ह्यांत मी गेलो. अनेक मतदारसंघात प्रचार केला. लोकांचा परिवर्तन करण्याचा मूड आहे. किती ताकदीने करतील ते पाहावे लागेल. लोकांना नितीशकुमार यांना बदलायचे आहे. नितीशकुमार जात आहेत. बिहारचे नवे मुख्यमंत्री तेजस्वी यादव असतील, असा दावा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.
तेजस्वी यादव यांनी वातावरण निर्माण केलंय, बिहारमध्ये परिवर्तन होणारच : चंद्रकांत खैरे आरजेडी (RJD) नेते तेजस्वी यादव (tejashwi Yadav) यांनी बिहार विधानसभा Bihar Election) निवडणुकीचं वातावरण बदलून टाकलंय. बिहारच्या जनतेला बदल हवाय, हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे बिहारमध्ये नक्कीच परिवर्तन पाहायला मिळेल, असा विश्वास शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या:
मोफत कोरोना लशीचे आश्वासन म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
निवडणूक आयोग ही भाजपचीच शाखा, त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करु नये : संजय राऊत
(Tejashwi Yadav I will cut CM and ministers salaries to give jobs to 10 Lakh peoples in Bihar)